Virat Kohli Century: IPL 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव केला.
या सामन्यात विराट कोहलीने चालू मोसमातील पहिले शतक आणि आयपीएल कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले.
या शतकासोबतच कोहलीने विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. धावांचा पाठलाग करताना कोहलीने हे शतक झळकावले.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 62 चेंडूत शतक पूर्ण केले. मात्र, शतक पूर्ण करताच पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 63 चेंडूत तूफानी शतक ठोकले. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत त्याने ख्रिस गेलची बरोबरी केली.
आयपीएलमध्येही (IPL) गेलच्या नावावर सर्वाधिक 6 शतके आहेत. आता कोहली त्याच्यासोबत संयुक्तपणे नंबर-1 बनला आहे.
या सामन्यात कोहलीने विश्वविक्रमही केला. T20 क्रिकेटमध्ये एका संघासोबत खेळताना 7500 धावा पूर्ण करणारा कोहली जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.
एवढेच नाही तर विराटने सहाव्यांदा आयपीएलमध्ये 500 हून अधिक वैयक्तिक धावसंख्या केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
या मोसमात त्याने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 538 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये सर्वांना मागे टाकून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
आयपीएलमध्ये ओपनिंग करताना विराट-फॅफ जोडीने एका मोसमात सर्वाधिक धावा केल्या आहेत. दोघांनी चालू मोसमात 13 सामन्यांत 854 धावा काढल्या आहेत.
यापूर्वी, हा विक्रम जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नावावर होता. हैदराबादकडून खेळताना दोघांनी 2019 मध्ये 791 धावा काढल्या होत्या.
184* – गौतम गंभीर, ख्रिस लिन (KKR) विरुद्ध GL, राजकोट, 2017
181* – विराट कोहली, देवदत्त पडिक्कल (RCB) विरुद्ध RR, मुंबई WS, 2021
181* - शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस (CSK) विरुद्ध PBKS, दुबई, 2020
172 - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (RCB) विरुद्ध SRH, हैदराबाद, 18 मे 2023
6 – ख्रिस गेल
6 – विराट कोहली
5 – जोस बटलर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.