Hardik Pandya Photo Viral Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने शिखर धवनला केलं किस, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

PBKS vs GT, Hardik Pandya Photo Viral: आयपीएल 2023 चा 18 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात मोहाली येथे खेळला जात आहे.

Manish Jadhav

PBKS vs GT, Hardik Pandya Photo Viral: आयपीएल 2023 चा 18 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात मोहाली येथे खेळला जात आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्याचवेळी, नाणेफेकीपूर्वी चाहत्यांना मैदानावर एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा हार्दिक पंड्याने पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला किस केले. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हार्दिकने टॉस जिंकला

गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल (IPL-2023) च्या 16 व्या हंगामातील 18 वा सामना गुरुवारी मोहाली येथे चालू आहे.

मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यूजर्स म्हणाले...

सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) एका खेळाडूचे चुंबन घेतले. हा खेळाडू दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन आहे.

धवन सध्या आयपीएलच्या चालू हंगामात पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे. सोशल मीडियावर यूजर्संनी या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

एका वापरकर्त्याने लिहिले - काय प्रेम आहे. आणखी एका युजरने लिहिले - मॅचपूर्वी असे प्रेम व्यक्त केले जात आहे, हे देखील चुकीचे आहे. अनेक युजर्संनीही या फोटोचे कौतुक केले आहे.

हार्दिकचे गुजरात संघात पुनरागमन

या सामन्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या गुजरात संघात परतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो गेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू राशिद खानने कमान सांभाळली. अहमदाबादमध्ये खेळलेला तो सामना गुजरातने शेवटच्या चेंडूवर गमावला असला तरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Closure: वास्को वाहतुकीत मोठे बदल! रेल्वे अंडरब्रिज 6 दिवसांसाठी बंद, पोलिसांनी दिलाय पर्यायी मार्ग; Watch Video

Terrorist Masood Azhar: 'मी एलन मस्क आणि मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत, जिहादसाठी पैशाची कमी नाही...' दहशतवादी मसूद अजहरच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

Oppo Find X9 Pro भारतात लाँच; 7500 mAh बॅटरी आणि 200 MP कॅमेरासह मिळणार तगडे फीचर्स, किंमत फक्त...

Rohit Sharma: 'हिटमॅन' इज बॅक! एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा करणार संघाचे नेतृत्त्व

रिलेशनशीप, मोबाईलवरुन वर्गात अपमान केला, मानसिक धक्का बसलेल्या 17 वर्षीय मुलीने शाळाच सोडली; गोव्यात शिक्षकाविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT