Rashid Khan Dainik Gomantak
क्रीडा

Rashid Khan Video: करामती खानची रेकॉर्डब्रेक Hat-Trick! 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

IPL 2023: राशिद खानने गुजरात टायटन्सकडून हॅट्रिक घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Rashid Khan Hat-Trick: रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत झालेला गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघातील सामना नाट्यमयरित्या संपला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात केकेआरने 3 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात गुजरातकडून राशिद खानने हॅट्रिक घेतली होती, पण रिंकू सिंगच्या सलग 5 षटकारांमुळे केकेआरने विजय मिळवला. मात्र राशिदच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

या सामन्यात गुजरातने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला अखेरच्या 5 चेंडूत 28 धावांची गरज होती. पण रिंकू सिंगने सलग 5 षटकार मारत केकेआरला विजय मिळवून दिला. पण त्याआधी या सामन्यात गुजरातचा प्रभारी कर्णधार राशिद खानने हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.

या सामन्यात केकेआरकडून वेंकटेश अय्यर (83) आणि कर्णधार नितीश राणा (45) या दोघांनी चांगली कामगिरी करत संघाच्या विजयाचा पाया रचला होता. पण त्यानंतर 17 व्या षटकात गोलंदाजी करताना राशिदने पहिल्याच चेंडूवर धोकादायक आंद्रे रसलला एका धावेवर श्रीकर भरतच्या हातून झेलबाद केले.

त्याच्या पुढच्याच चेंडूवर सुनील नारायण शुन्यावर जयंत यादवकडे झेल देत बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर राशिदने शार्दुल ठाकूरला पायचीत पकडले. त्यामुळे राशिदने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये हॅट्रिक साजरी केली. तसेच गुजरातला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. मात्र, अखेरच्या षटरात रिंकूच्या तुफानी खेळीमुळे केकेआरने गुजरातवर मात केली.

तो आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा 19 वा खेळाडू ठरला. पण महत्त्वाचे म्हणजे टी20 क्रिकेटमधील त्याची ही एकूण चौथी हॅट्रिक ठरली. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये चारवेळा विकेट्सची हॅट्रिक घेणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये, बिग बॅश लीगमध्ये आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक घेतली आहे.

टी20 क्रिकेटमध्ये त्याच्याव्यतिरिक्त अँड्र्यू टाय, मोहम्मद सामी, अमित मिश्रा, आंद्रे रसेल आणि इम्रान ताहीर यांनी तीन वेळा हॅट्रिक घेण्याची कामगिरी नोंदवली आहे.

आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा तिसरा कर्णधार

दरम्यान, या सामन्यात गुजरातचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या आजारी असल्याने खेळला नाही. त्यामुळे राशिदने प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते. त्यामुळे तो आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा तिसरा कर्णधार ठरला आहे.

यापूर्वी युवराज सिंग आणि शेन वॉटसन यांनी असा कारनामा केला आहे. विशेष म्हणजे युवराजने दोनवेळा हा कारनामा केला आहे. युवराजने 2009 आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि डेक्कन चार्जर्स संघांविरुद्ध विकेट्सची हॅट्रिक घेतली होती. वॉटसनने 2014 साली राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT