MS Dhoni | Ambati Rayudu | Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: कॅप्टन धोनीच्या मनाचा मोठेपणा! IPL ट्रॉफी स्विकारताना रायुडू-जडेजाला घेतलं बोलावून, पाहा Video

चेन्नई सुपर किंग्सने पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर ती स्विकारताना कर्णधार एमएस धोनीने अंबाती रायुडू आणि रविंद्र जडेजाला बोलावून घेतले होते.

Pranali Kodre

MS Dhoni receives IPL 2023 trophy alongside Ravindra Jadeja and Ambati Rayudu: एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी मध्यरात्री इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. पावसामुळे रविवारीऐवजी राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी पार पडलेल्या अंतिम सामन्याच चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत पाचव्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केले.

पण या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनीने जी कृती केली, त्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर पावसाच्या अडथळ्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन चेंडूत चेन्नईला 10 धावांची गरज होती.

यावेळी चेन्नईकडून रविंद्र जडेजा मोहित शर्माच्या गोलंदाजीवर अखेरच्या दोन चेंडूत षटकार आणि मग विजयी चौकार मारला. यासह चेन्नईने हा सामना जिंकत आयपीएल 2023 विजेतेपदावर नाव कोरले.

धोनीचे मन जिंकणारे कृत्य

ज्यावेळी चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात येणार होती, तेव्हा स्टेजवर कर्णधार म्हणून धोनी उपस्थित होता. यावेळी ही ट्रॉफी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांच्या हस्ते देण्यात आली. पण ज्यावेळी ट्रॉफी स्विकारायची होती, त्यावेळी धोनीने अंबाती रायुडू आणि रविंद्र जडेजाला बोलावून घेतले.

रायुडूसाठी हा अंतिम सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. त्याने या सामन्यानंतर निवृत्त होत असल्याची घोषणा याआधीच केली होती. त्याचमुळे धोनीने त्यालाही बोलावून घेतले. त्यानंतर बिन्नी आणि शाह यांनी या तिघांकडे ही ट्रॉफी सोपवली.

यानंतर सर्व संघातील सदस्यही त्यांना सामील झाले आणि चेन्नईच्या संघाने विजेतेपदाच्या ट्रॉफीसह आनंद साजरा करण्यास सुरुवात केली.

चेन्नईची मुंबईशी बरोबरी

चेन्नई सुपर किंग्सचे हे पाचवे विजेतेपद ठरले आहे. त्यांनी यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या हंगामात विजेतेपद जिंकले आहे. यासह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या पाच आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT