Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

Delhi Capitals: दिल्ली संघात घुसला चोर? खेळाडूंचं सामानच सापडेना, जाणून घ्या सविस्तर

दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी सध्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीयेत, संघातील खेळाडूंचे सामान आता हरवल्याचे समजत आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals Players Missing Equipment: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ विजयासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यातच संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दिल्ली संघातील काही खेळाडूंची साधनेच गहाळ झाली आहेत.

दिल्लीने 15 एप्रिलला बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सामना खेळला. त्यानंतर बंगळुरूमधून दिल्लीला परत येताना खेळाडूंच्या महत्त्वाच्या गोष्टी हरवल्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार खेळाडूंच्या एकूण 16 बॅट, तसेच काही शूज, पॅड्स, थाय पॅड्स आणि ग्लव्ह्ज हरवले आहेत. 16 बॅटपैकी तीन डेव्हिड वॉर्नरच्या, दोन मिचेल मार्शच्या, तीन फिल सॉल्टच्या तसेच पाच यश धुलच्या असल्याचे समजले आहे.

15 एप्रिलच्या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाडू परत दिल्लीला आल्यानंतर त्यांचे सामना त्यांच्यापर्यंत पोहचवल्यानंतर त्यांना त्यातील काही गोष्टी हरवल्याचे समजले. दिल्लीने खेळाडूंच्या सामनाची ने-आण करण्यासाठी जबाबदारी लॉजिस्टिक कंपनीकडे सोपवली आहे.

या प्रकरणाबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की 'सर्वजणांनी काही ना काहीतरी हरवले आहे, हे समजल्यानंतर सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. याबद्दल लॉजिस्टिक डिपार्टमेंटकडे लवकरच तक्रार करण्यात येणार आहे.'

पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत दिल्ली

दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आयपीएल 2023 स्पर्धेत 5 सामने खेळले आहेत. यातील एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे दिल्ली संघ त्यांच्या अद्याप त्यांच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा करत आहेत. ते सध्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत.

आता दिल्लीला पुढील सामना 20 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवून या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी दिल्ली उत्सुक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly Live Updates: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष

Viral Video: नदीत पिकअप आणि मगरीचा थरार...! धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी हैराण

तुम्ही सेक्युलर नाहीच! भाजप आमदाराने 'हिंदूंचाच नव्हे, आमचा पक्ष सेक्युलर', म्हणताच विजय सरदेसाईंनी डिवचलं

SCROLL FOR NEXT