Aman Khan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: भन्नाट! अमन खानने एका हाताने कॅच घेत धोकादायक डू प्लेसिसला धाडले माघारी, पाहा Video

Pranali Kodre

Aman Khan one-handed catch: इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिट्लस संघात सामना होत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात अमन खानने घेतलेल्या झेल चर्चेत आला आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्यामुळे बेंगलोरकडून फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी डावाची सुरूवात केली.

या दोघांनी गेल्या काही सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही आक्रमक सुरुवात केली होती. हे दोघेही जवळपास 10 च्या धावगतीने धावा करत होते. पण डावाच्या पाचव्या षटकात फाफ डू प्लेसिसला मिचेल मार्शने 22 धावांवर बाद केले. त्याचा झेल अमन खानने अप्रतिमरित्या झेलला.

झाले असे की मार्शने या षटकातील टाकलेल्या चौथ्या चेंडूवर फाफने मोठा फटका खेळला. पण मिड-विकेटच्या क्षेत्रात अमन खानने उजवीकडे उडी मारत एका हाताने अफलातून झेल घेतला. त्याचा हा झेल पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. त्याच्या झेलाचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, फाफ बाद झाल्यानंतर विराट आणि महिपाल लोमरोरने डाव सावरण्यास सुरुवात केली. विराटने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. पण त्याला 11 व्या षटकात ललित यादवने 50 धावांवर बाद केले.

त्याच्यापाठोपाठ महिपाल लोमरोरही (26) बाद झाला. बेंगलोरला 14 आणि 15 व्या षटकात मोठे धक्के बसले. 14 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हर्षल पटेल (6) बाद झाला. तर 15 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर अनुक्रमे ग्लेन मॅक्सवेल (24) आणि दिनेश कार्तिक (0) यांना कुलदीप यादवने बाद केले. त्यामुळे सलग तीन चेंडूंवर तीन विकेट्स गेल्या.

अखेरीस चांगल्या सुरुवातीनंतरही बेंगलोरला 20 षटकात 6 बाद 174 धावाच करता आल्या. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT