Punjab Kings Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाबच्या फिरकीची जादू चालली! वॉर्नरच्या फिफ्टीनंतरही दिल्ली पराभूत, प्लेऑफ शर्यतीतूनही बाहेर

आयपीएल २०२३ मध्ये शनिवारी पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्याने ते प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर झाले आहेत.

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने 31 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे पंजाबने प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. मात्र, या पराभवासह दिल्लीचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

या सामन्यात पंजाबने दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकात 8 बाद 136 धावाच करता आल्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. पण अन्य कोणाला खास काही करता आले नाही.

या सामन्यात पंजाब किंग्सने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि फिलिप सॉल्ट यांनी दमदार सुरुवात दिली होती. या दोघांनीही सलामीला 69 धावांची भागीदारी रचली होती. मात्र पॉवरप्लेची 6 षटके संपल्यानंतर दिल्लीला पहिला धक्का सॉल्टच्या विकेटने बसला.

सातव्या षटकात त्याला हरप्रीत ब्रारने 21 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर पुढच्याच षटकात मिशेल मार्शला अवघ्या 3 धावांवर राहुल चाहरने पायचीत केले.यानंतर मात्र दिल्लीने नियमित अंतराने विकेट्स गमवण्यास सुरुवात केली.

दरम्यान कर्णधार वॉर्नरने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण 9 व्या षटकात ब्रारने वॉर्नरसह रिली रोसौला बाद करत दिल्लीला दुहेरी धक्का दिला. वॉर्नर 27 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारांसह 54 धावा करून बाद झाला. रोसौला 5 धावाच करता आल्या.

यानंतर पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेला अक्षर पटेलही यावेळी खास काही करू शकला नाही आणि तो 1 धाव करूनच राहुल चाहरच्या चेंडूवर पायचीत झाला. पाठोपाठ पुढच्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलेला मनिष पांडेही शुन्यावर ब्रार विरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला.

अखेरीस अमन खान आणि प्रविण दुबेने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तेही फार काही करू शकले नाहीत. अमनला आणि प्रविण दोघेही प्रत्येकी 16 धावा करून बाद झाले. शेवटी कुलदीप यादव 10 धावांवर आणि मुकेश कुमार 6 धावांवर नाबाद राहिला.

पंजाबकडून फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.हरप्रीत ब्रारने 4 षटकात 30 धावा खर्च करताना सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच राहुल चाहरे आणि नॅथन एलिसने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी पंजाबकडून प्रभसिमरन आणि कर्णधार शिखर धवनने डावाची सुरुवात केली होती. पण धवन केवळ 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांच्याही विकेट्स झटपट गेल्या. त्यामुळे पंजाबचा संघ 3 बाद 45 धावा असा संकटात सापडला होता.

मात्र त्यानंतर सॅम करनने प्रभसिमरनची चांगली साथ दिली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारीही केली. विशेष म्हणजे या भागीदारीत सॅम करनचे योगदान 20 धावांचेच राहिले. ही भागीदारी रंगत असतानाच सॅम करनला प्रविण दुबेने 20 धावांवर अमन खानच्या हातून झेलबाद केले. त्यानंतरही पंजाबने हरप्रीत ब्रारचीही (2) विकेट लगेचच गमावली.

पण यादरम्यान एका बाजूने विकेट्स जात असताना प्रभसिमरनने एक बाजू भक्कम सांभाळली होती. त्याने एका बाजूने झुंज देताना शतकी खेळीही साकारली. मात्र शतकानंतर तो लगेचच 19 व्या षटकात बाद झाला. त्याने 65 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांसह 103 धावांची खेळी केली.

अखेरीस पंजाबकडून सिकंदर रझा 11 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे पंजाबला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 167 धावा करता आल्या.

दिल्लीकडून इशांत शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल, प्रविण दुबे, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 1 विकेट घेता आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT