Rashid Khan & Sarfaraz Khan  Dainik Gomantak
क्रीडा

DC vs LSG, IPL 2023: धडाम… सरफराज खानची रशीद खानला टक्कर, पाहा व्हिडिओ

IPL 2023, DC vs GT: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सध्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरु आहे.

Manish Jadhav

IPL 2023, DC vs GT: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सध्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यादरम्यान सामन्यात दोन खेळाडूंमध्ये एक छोटीशी घटना घडली.

वास्तविक, रशीद खान आणि सरफराज खान यांची टक्कर झाली. यामध्ये रशीद खाली पडला. हे दृश्य 15 व्या षटकात पाहायला मिळाले.

रशीद खाली पडला

15 व्या षटकात राशिद खानने (Rashid Khan) पाचवा चेंडू सरफराज खानला टाकला आणि सरफराजने तो चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे वळवला. यादरम्यान धाव काढण्यासाठी सरफराज वेगाने धावला.

दुसरीकडे, रशीद क्रिजजवळ उभा होता, सरफराजची नजर चेंडूवर होती. त्याचवेळी रशीदनेही सरफराजकडे पाहिले नाही. अशा स्थितीत दोघांमध्ये टक्कर झाली, यामध्ये रशीद खाली पडला.

रशीदची अप्रतिम गोलंदाजी

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या सरफराज खानने 34 चेंडूत दोन चौकारांसह 30 धावा केल्या.

कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 32 चेंडूत 37 धावा आणि अक्षर पटेलने 22 चेंडूत 36 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 162 धावा केल्या.

दुसरीकडे, रशीद खानने गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले. तर मोहम्मद शमीने 4 षटकात 41 धावा देत 3 बळी घेतले. अल्झारी जोसेफने 4 षटकांत 29 धावा देत 2 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT