CSK vs PBKS Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: धोनीने जिंकला टॉस! पंजाबसमोर चेन्नईचं आव्हान, असे आहेत Playing XI

आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना होत आहे.

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत रविवारी डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी चेन्नईने त्यांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तसेच पंजाबने एक महत्त्वाचा बदल केला आहे. पंजाब संघात हरप्रीत ब्रारचे पुनरागमन झाले आहे. त्याला गुरनूर ब्रारच्या जागेवर स्थान मिळाले.

या सामन्यासाठी चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये डेवॉन कॉनवे, मोईन अली, मथिशा पाथिराना आणि महिश तिक्षणा या चार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम करन आणि कागिसो रबाडा या चार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी ४ परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूंना वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी चेन्नईने राखीव खेळाडूंमध्ये आकाश सिंग, ड्वेन प्रिटोरियस, सुभ्रांशु सेनापती, शेख राशीद आणि राजवर्धन हंगारगेकर यांची निवड केली आहे, तर पंजाबने प्रभसिमरन सिंग, मॅथ्यु शॉर्ट,ऋषी धवन, मोहित राठी आणि शिवम सिंग यांची निवड राखीव खेळाडूंमध्ये केली आहे.

दरम्यान, हा दोन्ही संघांसाठी प्रत्येकी ९ वा सामना आहे. चेन्नईने आत्तापर्यंत ८ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने पराभूत झाले आहेत, पंजाबने आत्तापर्यंत ८ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत आणि ४ सामने पराभूत झाले आहेत.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा.

  • पंजाब किंग्स - अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT