MI vs RR Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: राजस्थानने 1000 व्या मॅचमध्ये जिंकला टॉस! आर्चरचे कमबॅक, अर्जुन बाहेर; पाहा Playing XI

आयपीएलमध्ये रविवारी 1000 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होत आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी दोन सामने खेळले जात आहेत. दुसरा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा आयपीएलच्या इतिहासातील 1000 वा सामना आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये बदल झाला आहे.

राजस्थानच्या संघात ट्रेंट बोल्टचे पुनरागमन झाले आहे. तसेच मुंबई इंडियन्सने या सामन्याच जोफ्रा आर्चर आणि अर्शद खानला संधी दिली आहे. त्यामुळे जेसन बेऱ्हेंडॉर्फ आणि अर्जुन तेंडुलकर हे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाले आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या ३६ व्या वाढदिवशी हा सामना खेळताना दिसणार आहे.

या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, रिली मॅरेडिथ आणि जोफ्रा आर्चर या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेंट बोल्ट या परदेशी खेळाडूंना संधी मिळाली आहे.

दोन्ही संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू असल्याने दोन्ही संघांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूंनाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्सने नेहल वढेरा, रमनदीप सिंग, विष्णू विनोद, शम्स मुलानी आणि अर्जुन तेंडुलकर यांची निवड केली आहे. तसेच राजस्थानने डेनोवन फेरेइरा, मुरुगन अश्विन, रियान पराग, कुलदीप यादव आणि कुलदीप सेन यांना राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली आहे.

मुंबई इंडियन्ससाठी हा 8 वा सामना आहे, तर राजस्थानचा हा 9 वा सामना आहे. मुंबईने आत्तापर्यंत ३ सामने जिंकले आहेत आणि 4 सामने पराभूत झाले आहेत. तसेच राजस्थानने 5 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने पराभूत झाले आहेत.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान

  • राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT