MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: 'तो फलंदाजीला आला, तेव्हा...' धोनीच्या 'त्या' दोन सिक्सबद्दल वूड बोललाच

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वूडविरुद्ध चेपॉक स्टेडियवर सलग दोन षटकार मारले होते.

Pranali Kodre

Mark Wood On MS Dhoni's Sixes: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील पहिलाच आठवड्यातील सामने सुरू असताना काही खेळाडूंनी आपल्यातील प्रतिभा दाखवली आहे. यामध्ये इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क वूडचाही समावेश आहे. त्याच्याकडे सध्या पर्पल कॅप देखील आहे.

पण असे असले तरी 3 एप्रिलला झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या वूडविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने दोन सलग खणखणीत षटकार मारले होते. खरंतर वूडने या सामन्यातही चांगली गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या होत्या.

मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसकेकडून अखेरच्या षटकार धोनी फलंदाजीला आला. हे षटक वूड टाकत होता. धोनीने फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या दोनच चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकले. यातील एक षटकार तर 89 मीटर लांब गेला.

त्यावेळी वूडने चांगली गोलंदाजी केली होती. पण धोनीने अचूक फटके मारत हे षटकार मारले होते. वूडने सामन्यानंतर सांगितले की त्याने योजनेप्रमाणेच गोलंदाजी केली होती, पण तरीही धोनी त्यावर मात करण्यात यशस्वी ठरला.

वूडने सांगितले, 'मी आणि केएल राहुलने चर्चा केली होती. आम्ही शांत राहून त्याला बाद कसे करायचे हा विचार करत होतो. मी बचावात्मक चेंडू टाकण्याचा विचार करत नव्हतो. मी खरंतर त्याला धावा करण्यापासून रोखून त्याला बाद करण्याच्या विचारात होतो. दुर्दैवाने त्यामुळे मला 12 धावा खर्च कराव्या लागल्या.'

'पण त्याने मारलेला दुसरा षटकार शानदार होता. मी आणि केएलने ठरवल्याप्रमाणेच मी गोलंदाजी केली होती. मी थोडा वाईड बाऊंसर टाकला होता, ज्यामुळे त्याने मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पुढे जावे लागेल. पण त्याने इतक्या लांब तो शॉट खेळला, खरंच शानदार होते.'

याबरोबरच त्यावेळी एमए चिदंबरम स्टेडियममध्ये मोठ्याप्रमाणात आवाज असल्याचेही वूडने सांगितले. त्याने सांगितले की 'धोनी ज्यावेळी फलंदाजीला आला आणि त्याने ते शॉट खेळल्यानंतर जो आवाज होता, तो मी आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी सर्वाधिक होता. ते डोळे उघडणारे होते. पण जेव्हा मी मागे वळून पाहातो, तेव्हा हा मला एक चांगला अनुभव वाटतो.'

महत्त्वाचे म्हणजे वूडने आयपीएलमध्ये 2018 साली धोनीच्याच नेतृत्वाखाली सीएसकेकडून पदार्पण केले होते.

दरम्यान, 3 एप्रिलला झालेल्या सामन्याच सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 217 धावा केल्या होत्या. त्यानंतर लखनऊला 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 7 बाद 205 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे तो सामना सीएसकेने 12 धावांनी जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT