Mahendra Singh Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चेपॉकमध्ये माहीच्या सेनेचा घातक रेकॉर्ड, 1426 दिवसांनी CSK परतणार!

IPL 2023, CSK vs LSG: एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या घरच्या म्हणजेच चेन्नईतील चेपॉक मैदानावर सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे.

Manish Jadhav

IPL 2023, CSK vs LSG: एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या घरच्या म्हणजेच चेन्नईतील चेपॉक मैदानावर सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे.

चेन्नईने एप्रिल 2019 मध्ये या मैदानावर शेवटचा सामना खेळला होता. आता पुन्हा एकदा माहीची धाकड प्लेइंग इलेव्हन या मैदानावर उतरणार आहे.

आयपीएल 2023 चा सहावा सामना या मैदानावर CSK आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुजरातकडून पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जचा एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर एक मोठा रेकॉर्ड आहे.

CSK चा भयानक रेकॉर्ड

चेन्नई संघाने या मैदानावर 2019 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) शेवटचा सामना खेळला होता. त्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता तब्बल 1426 दिवसांनंतर पुन्हा एकदा माही… माही… थाला… थालाची हाक या मैदानावर ऐकायला मिळणार आहे. 68व्या आयपीएल सामन्याचे यजमानपदासाठी मैदान सज्ज झाले आहे. चेन्नईने याआधी या मैदानावर एकूण 56 सामने खेळले आहेत.

या मैदानावर चेन्नईची विजयाची टक्केवारी 80 च्या आसपास आहे. संघाने येथे 40 सामने जिंकले असून 16 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

सीएसकेने या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना 26 सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करताना 14 वेळा विजय मिळवला आहे.

या मैदानावर आयपीएलचे एकूण 67 सामने खेळले गेले आहेत

या मैदानावर आयपीएलचे एकूण 67 सामने खेळले गेले आहेत. पहिला खेळणारा संघ 41 वेळा जिंकला आहे, तर पाठलाग करणाऱ्या संघाने 26 वेळा विजय मिळवला आहे.

म्हणजेच, या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे सोपे आहे. इथली खेळपट्टी सामान्यतः फिरकीपटूंनाही उपयुक्त ठरते. येथे शेवटचा सामना 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला होता.

आयपीएल 2021 चा तो पहिला टप्पा होता. तो सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी 162 धावांची आहे.

म्हणजे, चेन्नईला खूप जास्त स्कोअरिंग मॅचेस पाहायला मिळण्याची शक्यता नाही. लखनऊचा संघ प्रथमच या मैदानावर उतरणार आहे.

ही चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन असू शकते

डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, सिमरनजीत सिंग, दीपक चहर.

चेन्नईचे स्कॉड

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, सिसंदा डी सिंधू, तुरुंग, एन. , मतिशा पाथीराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महिष थिक्श्ना, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT