CSK vs KKR Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नई सज्ज, पण समोर कोलकाताचं आव्हान, पाहा दोन्ही टीमचे Playing XI

आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना खेळवला जाणार आहे

Pranali Kodre

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 61 वा सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) होणार आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी चेन्नईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण कोलकाताच्या संघात एक बदल झाला आहे. कोलकाता संघात वैभव अरोराला अनुकूल रॉय ऐवजी संधी देण्यात आली आहे.

चेन्नईने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये डव्हॉन कॉनवे, मोईन अली आणि महिश तिक्षणा या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच कोलकाताने रेहमनुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

त्यामुळे चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीनच परदेशी खेळाडू असल्याने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी किंवा भारतीय खेळाडूला वापरू शकतात. तसेच कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय खेळाडूलाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये चेन्नईने मथिशा पाथिराना, निशांत सिंधू, सुभ्रांशू सेनापती, शेख राशीद आणि आकाश सिंग यांना संधी दिली आहे. कोलकाताकडून राखीव खेळाडूंमध्ये वेंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, एन जगदिशन, उमेश यादव आणि लॉकी फर्ग्युसन यांना संधी दिली आहे.

या सामन्यात चेन्नईने विजय मिळवल्यास ते प्लेऑफमधील स्थान पक्के करणार आहेत. तसेच असे झाल्यास कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. मात्र, जर चेन्नईला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला, तर त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुढच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागेल, तर कोलकाताने विजय मिळवल्यास ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षणा

  • कोलकाता नाईट रायडर्स - रहमानुल्लाह गुरबाज(यष्टीरक्षक), जेसन रॉय, नितीश राणा(कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT