Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill IPL 2023: गिल दा मामला... फायनलमध्ये शुभमनने धोनी ब्रिगेडचे मनसुबे केले फस्त; नावावर केला मोठा रेकॉर्ड!

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने आहेत.

Manish Jadhav

Shubman Gill IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरु आहे.

या सामन्यात CSK ने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत सीएसकेला लवकर यश मिळेल अशी आशा होती, परंतु शुभमन गिल आणि ऋद्धिमान साहा यांनी मिळून धोनी ब्रिगेडचे मनसुबे उद्ध्वस्त केले.

दरम्यान, शुभमन गिल (Shubman Gill) आणि रिद्धिमान साहा यांनी पहिल्या विकेटसाठी सात षटकांत 67 धावांची भागीदारी केली. गिलने अवघ्या 20 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली, ज्यात सात चौकारांचा समावेश होता.

मात्र, दीपक चहरनेही या खेळीदरम्यान गिलला दोन जीवदान दिले, ज्याचा फायदा त्याने घेतला. रवींद्र जडेजाच्या लेन्थ बॉलवर कर्णधार एमएस धोनीने गिलला यष्टीचीत केले.

दुसरीकडे, ऋद्धिमान साहाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 39 चेंडूंचा सामना करत 54 धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि एक षटकार आहे. साहाला दीपक चहरने एमएस धोनीच्या करवी झेलबाद केले.

दुसरीकडे, या शानदार खेळीमुळे 23 वर्षीय शुभमन गिलने एक खास विक्रम केला. गिलने आता जोस बटलरला मागे टाकून आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे.

शुभमन गिलने IPL 2023 मध्ये 17 सामन्यात 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या. यादरम्यान गिलच्या बॅटमधून तीन शतके आणि चार अर्धशतके झळकली. गिलला आयपीएल 2023 मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्याचीही खात्री आहे.

तसेच, आयपीएलच्या (IPL) एका मोसमात 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा गिल हा तिसरा खेळाडू ठरला. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली 973 धावांसह अव्वल स्थानावर आहे. 2016 च्या मोसमात त्याने या धावा केल्या होत्या. इंग्लिश खेळाडू बटलर 863 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

विराट कोहलीचा विक्रम मोडीत निघाला

विराट कोहलीचाही मोठा विक्रम मोडीत काढत गिल नंबर-1 बनला. खरे तर, गिलने एका मोसमात फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा कोहलीचा विक्रम मोडला आहे.

कोहलीने 2016 च्या आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध 364 धावा केल्या होत्या. विराटचा हा विक्रम आता शुभमन गिलने मोडला आहे.

या सामन्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने 40 धावा करताच ही नोंद आपल्या नावावर केली. गिलने या मोसमात फिरकी गोलंदाजांविरुद्ध 378 धावा केल्या आहेत.

एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा:

973- विराट कोहली (RCB, 2016)

890- शुभमन गिल (गुजरात टायटन्स, 2023)

863- जोस बटलर (राजस्थान रॉयल्स, 2022)

848- डेव्हिड वॉर्नर (सनराईजर्स हैदराबाद, 2016)

735 - केन विल्यमसन (सनराईजर्स हैदराबाद, 2018)

आयपीएल हंगामात सर्वाधिक चौकार

128 - जोस बटलर (राजस्थान रॉयल्स, 2022)

122 - विराट कोहली (RCB, 2016)

119 - डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद, 2016)

118 - शुभमन गिल (गुजरात टायटन्स, 2023)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्करोग रुग्णांसाठी दिलासा! आता तासनतास चालणारे उपचार अवघ्या 7 मिनिटांत होणार पूर्ण; 'रोश'ने भारतात लाँच केले नवीन इंजेक्शन

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

SCROLL FOR NEXT