Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'मी आगामी आयपीएलमध्ये खेळणार...', बेन स्टोक्सने केले स्पष्ट

Ben Stokes: मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात होणार आहे.

Manish Jadhav

IPL 2023 Ben Stokes: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) आगामी हंगाम 31 मार्चपासून सुरु होणार आहे. मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात होणार आहे.

या मोसमाला सुरुवात होण्याआधी इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने त्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे. तो आयपीएल 2023 मधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती, अशा परिस्थितीत तो या मोसमातून बाहेर जाऊ शकतो, अशा बातम्या येत होत्या.

बेन स्टोक्सने त्याच्या फिटनेसबद्दल हे मोठे अपडेट दिले

न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) दुसऱ्या कसोटी सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स अस्वस्थ दिसत होता. या सामन्याच्या पहिल्या डावात एकही षटक न टाकणाऱ्या बेन स्टोक्सने दुसऱ्या डावात केवळ 2 षटके टाकली, त्यामुळे आता त्याने स्वत: त्याच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

सामना संपल्यानंतर बेन स्टोक्स म्हणाला की, 'मी आगामी आयपीएलमध्ये (IPL) खेळणार आहे. मी सीएसकेचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांच्या संपर्कात आहे, त्यांना माझ्या तब्येतीची सर्व माहिती आहे. ऍशेसला तीन-चार महिने बाकी आहेत. सर्व काही व्यवस्थित होईल याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या फिजिओसह कठोर परिश्रम घेतले आहेत. पण कसोटी सुरु होताच इथे खूप अवघड झाले आहे, कारण खेळ खूप वेगवान झाला आहे.'

IPL 2023 साठी CSK संघ

एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, डेव्हॉन कॉनवे, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, दीपेश चौधरी, मथिशर पंथन, दीपेश पाटील, प्रशांत सोलंकी, महेश तिक्ष्णा, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT