20 thousand IPL Ticket: भारत हा क्रिकेटवेडा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अनेकदा क्रिकेट चाहते अनोख्या गोष्टीही करताना दिसतात. त्यांचे क्रिकेटवरील प्रेम स्टेडियममध्येही पाहायला मिळते. पण गेल्या तीन वर्षात कोरोनाच्या भीतीने स्टेडियम पूर्णपणे खुली झाली नव्हती. मात्र आता पुन्हा सर्व पुर्ववत होत असताना स्टेडियमही खुली करण्यात आली आहेत.
यंदाची इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 16 वा हंगामही पूर्वीच्या होम-अवे पद्धतीप्रमाणे खेळवला जात आहे. म्हणजेच प्रत्येक संघ आपापल्या घरच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात सामने खेळणार आहे. तसेच यंदा स्टेडियमही प्रेक्षकांसाठी पूर्ण क्षमतेने खुली करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे महागडी तिकीटेही घ्यायला चाहते मागे-पुढे पाहाताना दिसत नाहीयेत. जवळपास सर्वच स्टेडियम पूर्णपणे भरलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिल्या सामन्याच्या महागड्या तिकीटांमध्ये एका प्रीमीयम तिकीटाची किंमत 20 हजार रुपये देखील होती.
पण, एवढ्या 20 हजाराच्या तिकीटामध्ये नक्की काय सुविधा असतात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर सध्या एका @submoun_geel असे नाव असलेल्या सोशल मीडिया युजरने इंस्टाग्रामवर एक रिल शेअर केले आहे, यामध्ये त्याने या तिकीटात मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली आहे.
त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की तो 20 हजारांच्या तिकीट खरेदी केल्यानंतर इलेक्ट्रिक कारमधून प्रिमियम लाँजपर्यंत पोहचला. त्यानंतर तो व्यक्ती लाँजमध्ये पोहचला. तिथे झेंडे, उशा, बॅनर्स आणि गुजरात टायटन्सचे टी-शर्ट्स ठेवले आहेत. त्यानंतर त्याला तिथून संपूर्ण स्टेडियमचा नजारा दिसत आहे.
तसेच आयपीएल 2023 चा उद्घाटन सोहळाही अगदी समोरूम पाहायला मिळाला आहे. तसेच रात्रीच्या वेळी करण्यात आलेला लेझर शोचा देखील आनंद घेता आला. तसेच त्याला संपूर्ण सामना एका चांगल्या अँगलने पाहाता आला.
महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओवर शुभमन गिलनेही कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की 'चांगले आहे भाई. आम्हाला, तर चालत जावं लागतं.' तसेच हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, आयपीएल 2023 चा पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना गुजरात टायटन्सने 5 विकेट्सने जिंकला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.