Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: पृथ्वी शॉ पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार का?

IPL-2022 मधील पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात पृथ्वी शॉ हा सर्वात जास्त सर्वांच्या नजरेत येणारा खेळाडू आहे.

दैनिक गोमन्तक

IPL-2022 मधील पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा सर्वात जास्त सर्वांच्या नजरेत येणारा खेळाडू आहे. पंजाब किंग्जविरुद्ध पृथ्वी शॉ मैदानात दिसणार का? असा प्रश्न तमाम आयपीएल प्रेमींच्या मनामध्ये आहे. पृथ्वी शॉ काही दिवसांपासून आजारीच होता. त्यामुळे गेल्या अनेक सामन्यांत तो खेळूही शकलेला नाहीये. (IPL 2022 Will Prithvi Shaw play against Punjab Kings)

आता पृथ्वी शॉला टायफॉइडच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याबाबत माहिती देताना फ्रँचायझीने सांगितले की, 22 वर्षीय सलामीवीर पृथ्वीला या महिन्याच्या सुरुवातीला तो तापाने ग्रस्त झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पृथ्वीने 1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्ससाठी शेवटचा सामना खेळला होता आणि तेव्हापासून तो संघाच्या तीन सामन्यांमध्ये खेळू शकला नाहीये. पृथ्वीच्या पुनरागमनामुळे दिल्लीचा संघ मजबूत होऊ शकतो.

आता पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ खेळणार आहे की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेव्हा पृथ्वी शॉ आजारी पडला तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने प्रथम मनदीप सिंग आणि नंतर केएस भरत यांना सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले पण दोघेही त्यावेळी अयशस्वी ठरले.

दोघांपैकी कोणीही अशी खेळी खेळू शकलेलं नाही, आणि ज्यामुळे तो पृथ्वी शॉचा पर्याय बनू शकेल अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे चाहते पृथ्वी शॉच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. आता पृथ्वी शॉ हॉस्पिटलमधून परतला आहे पण तो किती दिवस खेळण्यासाठी तंदुरुस्त असेल हे आणखी स्पष्ट झालेले नाही. तसेच, तो पंजाब किंग्जविरुद्ध फलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT