Varun Chakravarthy Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: वरुण चक्रवर्तीने गोलंदाजीत आणलं व्हेरिएशन, ''दोन वर्षांपासून करतोय काम''

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने शानदार सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने शानदार सुरुवात केली आहे. संघाला यासंबंधी फारशी चिंता करण्याची गरज नाही. वरुण चक्रवर्तीने त्याच्या गोलंदाजीत एक नवा प्रयोग केला आहे. त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. 30 वर्षीय लेग-स्पिनर आयपीएल 2021(IPL 2022) मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने 17 सामन्यात 18 विकेट घेतल्या. आयपीएल 2022 मध्ये त्याने पाच सामन्यांमध्ये चार विकेट घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) केकेआरने आयपीएल 2022 पूर्वी कायम ठेवले होते. आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि व्यंकटेश अय्यरसह त्याला कायम ठेवण्यात आले आहे. (IPL 2022 Varun Chakravarthy has brought variation in bowling)

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, वरुण चक्रवर्तीने त्याच्या गोलंदाजीबद्दल सांगितले की, 'जर संघांनी माझ्याबद्दल काही योजना आखल्या असतील तर पूर्वीप्रमाणे विकेट मिळवणे कठीण आहे.' तो पुढे म्हणाला, ''गेल्या वर्षी भारतात सामने झाले तेव्हा सात सामन्यांमध्ये सहा-सात विकेट्स मी घेतल्या होत्या. पुढे मी आणखी विकेट घेतल्या. त्यामुळे तुम्हाला किती विकेट्स मिळतील हे सांगता येत नाही. मी एका नवीन व्हेरिएशनवर काम करत आहे, ज्याचा मी अधिक वापर करत आहे. या व्हेरिएशनचा योग्य वापर झाल्यास त्याचा योग्य तो फायदा येणाऱ्या काळात मला होईल.'' केकेआरला आता 15 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यात खेळायचा आहे.

वरुण दुखापतीतून सावरला

नवीन व्हेरिएशनबद्दल अधिक विचारले असता तो म्हणाला, ''मी लेग स्पिनवर काम करत आहे. गेली दोन वर्षे मी यावर काम करत होतो. मी काही सामन्यांमध्ये असे चेंडू टाकले आहेत आणि त्यावर मला विकेट्सही मिळाल्या आहेत. मला थोडा अधिक आत्मविश्वास दाखवून अशी गोलंदाजी करावी लागेल.'' वरुण चक्रवर्ती दुखापतींमुळे खूपच प्रभावित झाला आहे. टी-20 विश्वचषकानंतर तो गंभीर दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर पडला होता. याबाबत वरुण म्हणाला, ''माझ्या दुखापतीच्या उपचारासाठी मी एनसीएमध्ये होतो. आता बरा झालो आहे. मी कोणत्याही पेन किलरशिवाय मैदानावर जाऊ शकतो. त्यामुळे मला तंदुरुस्त वाटत आहे. त्यामुळे गोलंदाजी अधिक धारधार होण्यास मदत झाली आहे.''

वरुण राशिद खानला सर्वोत्तम स्पिनर मानतो

वरुण अफगाणिस्तानचा रशीद खानला (Rashid Khan) सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज मानतो. तो म्हणाला, ''क्रिकेटमध्ये तुम्हाला शॉट्स मिळतात. सध्या रशीद सर्वोत्तम स्पिनर आहे. त्याच्या गोलंदाजीवर अधिक धावाही येतात. पण तरीही तो सर्वोत्तम आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT