Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022 Orange Cap: ऑलराउंडर पांड्या फॉर्ममध्ये परतला; खेळला कर्णधारपदाची खेळी

गुजरातसमोर KKR होता, या सामन्यात गुजरातने आठ धावांनी विजय मिळवला आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये दोन नवीन संघ सामील झाले आहेत, यापैकी एक म्हणजे गुजरात टायटन्स (Gujarat Titans). या संघाने चालू हंगामातच खळबळ उडवून दिली. हा संघ सध्या गुणतालिकेत (Multiplication Table) अव्वल स्थानी आहे. टीमने सात सामने खेळले आहेत तर त्यातील सहा सामन्यांचा विजय आपल्या नावावर केला आहे, आणि एक सामना गमावला आहे. तर शनिवारी आयपीएलमध्ये डबल हेडरचा दिवस होता. गुजरातसमोर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) होता. या सामन्यात गुजरातने आठ धावांनी विजय मिळवला आहे. संघाच्या या विजयात कर्णधार हार्दिक पंड्या चांगल्याच चमकून निघाला. पांड्याने कोलकाताविरुद्ध 67 धावा केल्या. आपल्या खेळीत पांड्याने 49 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकारांसह दोन सिक्सर ठोकले. या खेळीनंतर पांड्याने ऑरेंज कॅपच्या यादीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला. याआधी पांड्या टॉप-10 मध्येही नव्हता. (IPL 2022 Orange Cap All rounder Hardik Pandya returns to form Played captaincy game)

या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पांड्या दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने लखनौ सुपर जायंट्स या आणखी एका नवीन संघाचा कर्णधार केएल राहुलची जागा घेतली. पांड्याच्या आता सहा सामन्यांत 295 धावा झाल्या आहेत तर, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतके झळाळली आहेत. मात्र, राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर अजूनही पहिल्या क्रमांकावरच आहे. त्याच्या आजूबाजूला एकही फलंदाज नाहीये. बटलरच्या सात सामन्यांत 491 धावा आहेत ज्यात तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे तर केएल राहुल तिसऱ्या स्थानावरती आहे. त्याच सात सामन्यात 265 धावा केल्या आहेत.

श्रेयस दुबेला मागे टाकतो

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) युवा फलंदाज शिव दुबेला कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने क्रमांकवारीत मागे टाकले. तर आत्तापर्यंत दुबे टॉप-5 मध्ये होता पण पांड्या आल्यानंतर त्याला बाहेर पडावे लागले आणि श्रेयसने त्याला आणखी एका जागेवर ढकलले. दुबेच्या सात सामन्यांत 239 धावा असून तो सातव्या क्रमांकावरती आहे. श्रेयसच्या आता आठ सामन्यांत 248 धावा पुर्ण झाल्या आहेत. तर तो सहाव्या स्थानावर आहे.

दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना सनरायझर्स हैदराबादशी खेळला गेला. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिने केवळ पाच धावा केल्या, तरीही त्याने टॉप-5 मध्ये स्थान मिळवले नाहीये. तर तो फक्त एका ठिकाणी खाली आला. डु प्लेसिस आता चौथ्या स्थानावरती आहे. त्याच्या आता आठ सामन्यांत पुर्ण 255 धावा झाल्या आहेत. पृथ्वी शॉ पाचव्या क्रमांकावरती आहे. शॉच्या सात सामन्यांत 254 धावा झाल्या आहेत. हैदराबादने आरसीबीचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. या विजयात हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माची बॅट जोरदार धावली म्हणायला हरकत नाही. त्याने 28 चेंडूत 47 धावांची खेळी खेळली आहे. आपल्या खेळीत त्याने आठ चौकार आणि एक सिक्सर लगावला. अभिषेक आता 15 व्या क्रमांकावर पोहोचला तर त्याने सात सामन्यांत 220 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT