Nicholas Pooran Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन, पाहा व्हिडिओ

सनरायजर्स हैदराबादने निकोलस पूरनचा एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात सोमवारी झालेल्या हैदराबादने गुजरातला हंगामातील पहिला पराभव चाखायला लावला. त्यांनी स्पर्धेतील दुसरा विजय मिळवत संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढवला असून यामुळे सर्वच खेळाडू काल आनंदी दिसत होते. त्यामुळेच सामन्यानंतर खेळाडू बसमधून जाताना संघाचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) देखील बॉलीवुड गाण्यामध्ये रमला होता.

निकोलस हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. तो या प्रवासादरम्यान बॉलीवुड गाणी ऐकताना दिसत होता. सनरायजर्स हैदराबादने (SunRisers Hyderabad) इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये पूरन अतिफ अस्लमने गायलेलं 'तू जाने ना हे' गाणं ऐकताना दिसत आहे. तो या गाण्यात रमलेला दिसत आहे. निकोलस पूरन याआधी पंजाब संघाकडून खेळत होता पण यंदा सनरायजर्स हैदराबादने त्याला IPL मेगा ऑक्शनमध्ये 10.75 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.

केन विल्यमसनची कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी आणि निकोलस पूरन, मार्करमचा फिनिशिंग टचच्या बळावर हैदराबादने गुजरातचा आठ गड्यांनी पराभव केला. या विजयासह हैदराबाद संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरा विजय साजरा केला. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने दिलेले 163 धावांचे आव्हान हैदराबाद संघाने पाच चेंडू आणि आठ गडी राखून सहज पार केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Goa Live Updates: सांकवाळ येथे फ्लॅटमध्ये चोरी; 8 लाखांचा ऐवज लंपास

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

SCROLL FOR NEXT