Jasprit Bumrah ANI
क्रीडा

जसप्रीतने मोडले KKRचे कंबरडे, 9 बॉल 5 विकेट, कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगीरी

मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपल्या लयीत परतण्याचे संकेत दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 15 मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI) स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पुन्हा एकदा आपल्या लयीत परतण्याचे संकेत दिले आहेत. (Jasprit Bumrah Bowling IPL 2022)

मुंबई इंडियन्स (MI) च्या जसप्रीत बुमराहने सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या या सामन्यात जसप्रीत बुमराहने अवघ्या 10 धावांत पाच बळी घेत विरोधी संघाचे कंबरडे मोडले. जसप्रीत बुमराहची टी-20 क्रिकेटमधील ही बेस्ट फिगर आहे.

जसप्रीत बुमराहने आपल्या 4 षटकांत केवळ 10 धावा दिल्या, त्यात एका षटकात मेडनचा समावेश होता. एवढेच नाही तर त्याने 18 बॉल डॉट लावले आणि संपूर्ण स्पेलमध्ये फक्त एक चौकार दिला. या स्पेलमध्ये बुमराह पूर्ण जोमात दिसला आणि त्याने फलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. जसप्रीत बुमराहने ज्या पाच विकेट घेतल्या, त्या त्याच्या गोलंदाजीत फक्त 9 चेंडूच्या फरकाने आल्या. या स्पेलने कोलकाता नाईट रायडर्सच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. बुमराहच्या या खेळीचे त्याची पत्नी संजना गणेशननेही कौतुक केले आहे. जसप्रीत बुमराहनेही या शानदार स्पेलसह अनेक विक्रम केले. हा त्याचा T20 क्रिकेटमधला पहिला फाइव्हर आहे, तसेच T20 क्रिकेटमधला त्याचा सर्वोत्तम स्पेल आहे. एवढेच नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम स्पेलमध्ये टॉप-5 मध्ये त्याचा समावेश झाला आहे.

जसप्रीत बुमराहच्या पाच विकेट्स-

• 14.2 षटके - आंद्रे रसेल पोलार्डच्या हाती झेलबाद झाला.

• 14.5 षटके- नितीश राणा यष्टिरक्षकाकडून झेलबाद झाला.

• 17.1 षटके - शेल्डन जॅक्सनला डॅनियल सॅम्सने झेलबाद केले.

• 17.3 षटके - पॅट कमिन्स टिळक वर्माकरवी झेलबाद झाला.

• 17.4 षटके - सुनील नरेन त्याच्याच चेंडूवर झेलबाद झाला.

केकेआरचे फलंदाज ठरले अपयशी

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (५/10) वेगवान गोलंदाजीमुळे डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2022 च्या 56व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 165 धावांत रोखले. कोलकाताने 20 षटकांत 9 विकेट गमावून 165 धावा केल्या आणि KKRसमोर विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले. केकेआरकडून व्यंकटेश अय्यर (43) आणि नितीश राणा (43) यांनी धमाकेदार खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT