Kolkata Knight Riders Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: केकेआर ठरला चॅम्पियन, सीएसकेचा उडवला धुव्वा

नव्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सचा उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने 6 गडी राखून पराभव केला.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 सीझनची सुरुवात अशा निकालाने झाली, ज्याची फार कमी लोकांना कल्पना केली असेल. नव्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सचा उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 6 गडी राखून पराभव केला. नव्या कर्णधारांच्या या स्पर्धेत कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने बाजी मारली. तर दुसरीकडे मात्र पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजाने निराशा केली. कर्णधारपद सोडल्यानंतर पहिला सामना खेळणाऱ्या एमएस धोनीने विक्रमी अर्धशतक झळकावले, परंतु हे अर्धशतकही चेन्नईला पराभवापासून रोखू शकले नाही. कोलकाताने 19 व्या षटकात सीएसकेकडून केवळ 132 धावांचे लक्ष्य गाठले. (IPL 2022 Kolkata Knight Riders beat Chennai Super Kings in the first match)

दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवार 26 मार्चपासून सुरु झालेल्या नव्या मोसमात अपेक्षेपेक्षा आणि अंदाजापेक्षा वेगळा निकाल लागला. परंतु सामन्याची सुरुवात जशी व्हायला हवी होती तशीच झाली. वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचे बोलले जात होते. नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाताचा कर्णधार अय्यरने पहिल्यांनदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे असे मानले जात होते की, 'वानखेडेच्या खेळपट्टीने सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत केली आणि तिथेच कोलकाताने सामन्यावर पकड मिळवली.'

गेल्या आयपीएल हंगामात बाहेर असणाऱ्या उमेश यादवने (Umesh Yadav) नव्या केकेआरच्या संघात रंग भरला. उमेशने पॉवरप्लेमध्ये 3 षटकांत संघाला मजबूत पकड मिळवून दिली. डावाच्या पहिल्याच षटकात उमेशने गेल्या मोसमातील ऑरेंज कॅप विजेता सलामीवीर ऋतुराज गायकवाडला तिसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याने तिसऱ्या षटकात सलामीवीर डेव्हॉन कॉनवेलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

याशिवाय, रॉबिन उथप्पाने तूफानी फटकेबाजी केली. परंतु शेल्डन जॅक्सननेही त्याला तुफानी वेगात यष्टिचित केले. नंतर मात्र पाहता- पाहता चेन्नईने आणखी तीन विकेट गमावल्या आणि संघाची धावसंख्या 61 धावांवर 5 बाद 5 अशी झाली. तोपर्यंत 11 षटकेही संपली होती. परंतु त्यात कर्णधार जडेजाला माजी कर्णधार धोनीची साथ मिळाली. क्लीन स्ट्राइकिंगसाठी ओळखला जाणारा जडेजा मात्र असंगाशी संग करत राहीला. सुरुवातीला काही वेळ स्थिरावल्यानंतर धोनीनेही तूफान फटकेबाजी केली. धोनीने केवळ 38 चेंडूंत ( 7 fours, 1 six) नाबाद 50 धावा केल्या. केकेआरसाठी उमेश यादव (2/20) सर्वात यशस्वी ठरला, तर वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT