CSK vs KKR: चेन्नई चा स्टार केकेआर च्या अडकला जाळ्यात

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या हंगामातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने आले आहेत.
 Rituraj Gaikwad
Rituraj Gaikwad Dainik Gomantak
Published on
Updated on

सुमारे साडेपाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, आयपीएल 2022 चा हंगाम सुरु झाला आहे. पहिल्याच सामन्यात, मागील हंगामातील शेवटचा सामना खेळणारे दोन दिग्गज संघ भिडले आहेत. शनिवारी 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या हंगामातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहेत. या सामन्यात चेन्नईचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. परंतु संघाची सुरुवात अशी झाली, ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. गेल्या मोसमात आपल्या शानदार फलंदाजीने धावांचा पाऊस पाडणारा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड नव्या मोसमातील पहिल्याच सामन्यात अवघ्या तीन चेंडूत बाद झाला. मागील मोसमात एकही सामना खेळू न शकलेल्या गोलंदाजाने त्याला बाद केले.- वेगवान गोलंदाज उमेश यादव. (Umesh Yadav dismissed Rituraj Gaikwad in the match against Chennai Super Kings)

दरम्यान, तब्बल 4 वर्षांनंतर केकेआरमध्ये पुनरागमन करणाऱ्या उमेश यादवकडून (Umesh Yadav) सुरुवातीपासूनच अपेक्षा होती. पहिल्याच सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने त्याच्यावर विश्वास दाखवत गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. याचाच फायदा घेत उमेश यादवने ऋतुराज आऊट केले. उमेशने सामन्यातील पहिलाच चेंडू टाकला असला तरी त्यातून त्याने आपली चुणूक दाखवली आहे.

 Rituraj Gaikwad
IPL 2022: श्रेयस अय्यरने टॉस जिंकत मारली बाजी, जाणून घ्या Playing 11

तसेच, सीएसकेकडून सलामीची जबाबदारी पार पाडणाऱ्या ऋतुराज गायकवाडने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चूक केली आणि त्याचा फटका त्याला सहन करावा लागला. गेल्या मोसमात सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या ऋतुराजला यावेळी खातेही उघडता आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com