IPL 2022 Orange Cap Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: शतक झळकावूनही जॉस बटलरला ऑरेंज कॅप मिळाली नाही, मानकरी ठरला 'हा' खेळाडू

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने शनिवारी आयपीएल 2022 च्या नवव्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 100 धावांचे शानदार शतक झळकावले आहे.

दैनिक गोमन्तक

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royal) सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) शनिवारी आयपीएल 2022 (IPL 2022) च्या नवव्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) 100 धावांचे शानदार शतक झळकावले आहे. या खेळीत त्याने 68 चेंडूत 11 चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. या मोसमात शतक झळकावणारा बटलर पहिला फलंदाज ठरला. मात्र, शतक झळकावल्यानंतर बटलरला जो मान मिळायला हवा होता तो तर मिळाला नाही. (IPL 2022 Joss Butler doesnt get Orange Cap despite scoring a century)

बटलर आणि मुंबई इंडियन्सचा इशान किशन यांच्यात 135-135 धावा समान आहेत, पण सध्या ऑरेंज कॅप इशानच्या डोक्यावर आहे. दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत, ईशानची सरासरी आणि स्ट्राईक रेट बटलरपेक्षा जास्त असला, तरी त्याच्याडोक्यावर सध्या ऑरेंज कॅप आहे.

जोस बटलर सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय शेवटच्या सामन्यात स्फोटक खेळी खेळणाऱ्या आंद्रे रसेलची राजवट 24 तासही टिकू शकली नाही आणि इशान किशनने त्याच्याकडून ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर घेतली म्हणायला हरकत नाही. रसेल आता तीन सामन्यांत 95 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) दोन सामन्यांत 93 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सैमसन (Sanju Samson) दोन सामन्यांत 85 धावांसह टॉप-5 मध्ये कायम स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT