Harshal Patel Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: मॅच दरम्यान हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन, सामन्यानंतर घराकडे रवाना

9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये खेळणारा आरसीबीचा (RCB) खेळाडू हर्षल पटेलच्या (Harshal Patel) बहिणीचे दु:खद निधन झाले. 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indian) सामना खेळत असताना त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. (IPL 2022 Hershel Patels sister dies during match he goes home after match)

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामना संपल्यानंतर हर्षल एका दिवसासाठी घरी परतला. आता तो 12 एप्रिलला CSK विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ते सामील झाल्यावर क्वारंटाइन यंत्रणा काय असेल, हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाहीये.

हर्षल पटेल गेल्या दोन वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी स्टार परफॉर्मरचा किताब मिळवत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने 2 बळी घेत संघाच्या 7 विकेटने विजयात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती.

संध्याकाळच्या सामन्यात बंगळुरूविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 6 बाद 151 धावा केल्या होत्या. हर्षलने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 4 षटकात 23 धावा देत 2 बळी आपल्या नावावर केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने 18.3 षटकांत 3 गडी गमावून विजयाचा किताब नावावर केला. अनुज रावतने नाबाद 66 धावांची खेळी केली तर विराट कोहली 48 धावा करून बाद झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

SCROLL FOR NEXT