IPL 2022: Mumbai Indians चे पराभव सत्र सुरूच

मुंबईबरोबर चेन्नईने देखील सलग पहिले चार सामने गमावले आहेत.
Mumbai Indians
Mumbai Indians Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये शनिवारी संध्याकाळी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबीने) दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या 152 धावांचे लक्ष्य आरसीबीने पार केले. दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल यांनी त्यांच्या संघासाठी उत्तम कामगिरी करत 7 विकेट्सने मोठा विजय नोंदवला. (Losing streak of Mumbai Indians team continues in IPL)

Mumbai Indians
IPL 2022: हिट मॅन चा फ्लॉप शो सुरुच, 'वेगवान सुरुवात करुनही...'

या मोसमातील मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा पराभव आहे. मुंबईबरोबर चेन्नईने देखील सलग पहिले चार सामने गमावले आहेत. पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स अजूनही या मोसमातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव
बंगळुरूच्या संघाला चांगली सुरुवात झाली. फॅफ-अनुज रावत जोडीने संघाला पन्नाशीच्या पुढे नेले. फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर धावांचा पाऊस पाडणाऱ्या अनुज रावतला साथ देण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आला. बंगळुरूसाठी सर्वात खास खेळी अनुज रावतची होती. त्याने 47 चेंडूत 66 धावा केल्या. त्याचवेळी माजी कर्णधार विराट कोहलीही 36 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. शेवटी दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेलने आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला.

Mumbai Indians
एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट चमूत मुख्य संघातील तिघांची वर्णी

मुंबई इंडियन्सचा डाव (151-6)
पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सला (MI) यश मिळाले नाही. रोहित शर्माने डावाची सुरुवात झंझावाती पद्धतीने केली, पण पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला. रोहित शर्मा (Rohit Sharma) 26 धावा करून बाद झाला. पहिली विकेट 50 धावांवर पडली आणि निम्मा संघ 62 धावांवर बाद झाला. पण पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव संघासाठी समस्यानिवारक म्हणून उदयास आला, त्याने प्रथम डाव हाताळला आणि नंतर धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com