ipl 2022 ex pakistan captain rashid latif on umran malik for t20 world cup 2022 and asia cup  Dainik Gomantak
क्रीडा

उमरान मलिकला टीम इंडियात संधी मिळावी, पाकिस्तानी कर्णधाराची मागणी

हैदराबाद संघात उमरान व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरचा अब्दुल समदही खेळत आहे

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या कामगिरीने आणि वेगवान गोलंदाजीने चाहत्यांसह दिग्गजांचे मन जिंकले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तो सध्या आयपीएल 2022 हंगामात त्याच्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाकडून खेळत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राशिद लतीफने त्याचे जोरदार कौतुक केले आहे.

उमरानने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध शेवटचा सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 4 षटकात 27 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. उमरानने श्रेयस अय्यरला यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. तर शेल्डन जॅक्सन झेलबाद झाला. या सामन्यात सनरायझर्स संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.

उमरान आशियाई फलंदाजांना बाद करेल

लतीफने एका यूट्यूब चॅनलवर सांगितले की, आयपीएलनंतर (IPL) टीम इंडिया आशिया कप आणि टी-20 वर्ल्डकपसाठी तयारी सुरू करेल. या दोन्ही स्पर्धेत तुम्हाला उमरानसाठी प्रयत्न करावा लागेल.

लोकांना असे वेगवान चेंडू खेळण्याची सवय नाही : लतीफ

पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार लतीफ म्हणाला की उमरान ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खूप फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यांना असे वेगवान चेंडू खेळण्याची सवय नाही. तो 150 च्या वेगाने चेंडू टाकतो. आता सर्व गोलंदाजांचा वेग कमी झाला आहे. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, शाहीन शाह आफ्रिदी, सगळ्यांचा वेग मंदावला आहे. शाहीनने स्विंगसह 145 पर्यंत मजल मारली. मला वाटते की उमरान मलिक पुढे जाऊन क्रिकेटमध्ये खूप नाव कमवेल.

सनरायझर्स फ्रँचायझीने उमरानला कायम ठेवले

उमरानने या मोसमात आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यात फक्त 5 विकेट घेतल्या आहेत. या मोसमात सनरायझर्स फ्रँचायझीने उमरान मलिकला कायम ठेवले आहे. यासाठी फ्रँचायझीने उमरानशी 4 कोटी रुपयांचा करार केला. हैदराबाद संघात उमरान व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरचा (Jammu Kashmir) अब्दुल समदही खेळत आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक आयोजित केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT