IPL 2022: Dhoni says goodbye to Chennai ? 
क्रीडा

IPL 2022 : धोनी स्वेच्छेने करु शकतो चेन्नईला रामराम ?

दैनिक गोमंतक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) पंधराव्या हंगामासाठी मोठा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक संघ आपल्या स्टर (Star) खेळाडूंना रिटेन (Retain) करुन इतर खेळाडूंना रिलीज (Release) करु शकतात. चेन्नई सुपर किंगमध्ये पहिल्या हंगामापासून कर्णधार असलेला एमएसधोनीला चेन्नईचा संघ रिटेन करेल यात शंका नाही. पण धोनी स्वतःच संघाबाहेर जाऊ शकतो. असे मत भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक (Anchor) आकाश चोप्रा याने व्यक्त केले आहे. (IPL 2022: Dhoni says goodbye to Chennai ?)

आकाश चोप्रा म्हणाला, आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नईच्या संघाने एमएस धोनीला जरी रिटेन करतील. पण तुम्ही जर धोनीला विचारले तर तो त्यांना विचारु शकतो तुम्ही मला का रिटेन करत आहात, कारण पुढील 3 वर्षे मी आयपीएल खेळत राहील का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही कोणत्याही खेळडूला रिटेन करु शकत नाही. असा जर नियम आला तर चेन्नई सुपर किंग या नियमाशी सहमत असेल. या संघात पुन्हा नवीन खेळाडू भरती होऊ शकतात. मग कोणत्याही खेळाडूला 15 ते 17 कोटी देऊन थांबविण्याची आवश्यकता भासणार नाही. संघ रविंद्र जडेजा आणि एमएस धोनीला रिटेन करेल. याबरोबरच त्यांना संधी मिळाल्यास ते आरटीएम कार्डचा वापर करुन दीपक चाहरला संघात स्थान देऊ शकतात. असे त्याने सांगितले. 

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनीने चेन्नईची धूरा संभाळली आहे. रोहीत शर्मानंतर धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने 3 वेळ आयपीएलच्या करंडकावर मोहोर उमटविली आहे. आयपीएल 2020 चा हंगाम सोडल्यास चेन्नईने प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 211 सामने खेळले असून, 40.2 च्या सरासरीने त्याने 4669 धावा केल्या आहेत. या त्याने 23 अर्धशतके झळकावली असून, नाबाद 84 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.  
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT