IPL 2021: KKR beat RCB by 9 wickets Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: विराटच्या आरसीबीचा पराभव करत KKRची पाचव्या स्थानी झेप

काल झालेल्या सामन्यामध्ये RCB आणि KKR संघ समोरासमोर होते.ज्यात KKR ने RCB चा 9 गडी राखून पराभव केला. (IPL 2021)

दैनिक गोमन्तक

काल आयपीएल 2021 (IPL 2021)चा दुसऱ्या भागातील दुसरा सामना होता आणि जर आपण एकूण पाहिले तर हा या मोसमातील हा 31 वा सामना होता. काल झालेल्या सामन्यामध्ये RCB आणि KKR संघ समोरासमोर होते.ज्यात KKR ने RCB चा 9 गडी राखून पराभव केला. आरसीबीने केकेआरला 93 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 10 षटकांत 1 गडी गमावत विजय मिळवला . केकेआरच्या विजयाचे नायक हे टीमचे ओपनर फलंदाज त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल ठरले. गिल आणि वेंकटेश यांच्यात सलामीच्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी झाली. गिल 48 धावांवर बाद झाला तर व्यंकटेश 41 धावांवर नाबाद राहिला. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी केकेआरकडून 3-3 विकेट घेतल्या.(IPL 2021: KKR beat RCB by 9 wickets)

गिल आणि अय्यरकडून मजबूत फलंदाजी

KKRच्या सलामीवीरांनी आरसीबीविरुद्ध जोरदार खेळ दाखवला. अय्यरने पहिल्या विकेटसाठी गिलसोबत 82 धावांची शानदार भागीदारी केली. गिल 48 धावा करून बाद झाला. वेंकटेश त्याच्या डावात 27 चेंडूत 41 धावांवर नाबाद राहिला. गिलच्या डावात 6 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता, तर व्यंकटेशच्या डावात 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.

केकेआरचे सर्वात यशस्वी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल होते. वरुणने 4 षटकांत 13 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय आंद्रे रसेलनेही 3 षटकांत 9 धावा देऊन 3 बळी घेतले. लॉकी फर्ग्युसनला 2 विकेट्स मिळाल्या तर प्रसिद्ध कृष्णाला 1 विकेट मिळाली.

केकेआरने आरसीबीला हरवून गुणतालिकेत उडी घेतली आहे.केकेआर संघ आता 7 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आला आहे. केकेआरचा या मोसमातील 8 सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे. त्याचबरोबर 8 सामन्यांमध्ये आरसीबीचा तिसरा पराभव आहे. मात्र, पराभवामुळे त्याच्या स्थितीवर परिणाम झाला नाही. आरसीबी अजूनही तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT