Brijbhushan Sharan Singh: भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी शुक्रवारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कडे भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, कुस्तीपटूंच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक (Olympics) संघटनेने शुक्रवारी संध्याकाळी कार्यकारी परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. IOA ने WFI प्रमुखांविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सात सदस्यीय समितीमध्ये मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आदींचा समावेश आहे.
एक दिवस आधी, कुस्तीपटूंनी क्रीडा प्रशासकावर अनेक एफआयआर (FIR) नोंदवण्याची धमकी दिली होती. IOA अध्यक्ष पीटी उषा यांना लिहिलेल्या पत्रात, कुस्तीपटूंनी दावा केला आहे की, राष्ट्रीय शिबिरातील प्रशिक्षक आणि क्रीडा विज्ञान कर्मचारी "पूर्णपणे अक्षम" होते.
दुसरीकडे, ब्रिजभूषण शरण सिंह यांचा वादांशी जुना संबंध आहे. ते गोंडा आणि कैसरगंजमधून सहा वेळा खासदार आहेत, त्यापैकी भाजपकडून पाच वेळा तर सपाकडून एकदा विजय मिळवला आहे. बाहुबली इमेज असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आले होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.