Stadium Dainik Gomantak
क्रीडा

UAE मध्ये आयोजित होणार इंटरनॅशनल T20 लीग, हे 6 संघ घेणार सहभाग

अमीरात क्रिकेट बोर्डने (ECB) सोमवारी जाहीर केले की, आमच्या T20 लीगचा पहिला हंगाम पुढील वर्षी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

अमीरात क्रिकेट बोर्डने (ECB) सोमवारी जाहीर केले की, आमच्या T20 लीगचा पहिला हंगाम पुढील वर्षी होणार आहे. ECB ने याला आंतरराष्ट्रीय लीग T20 असे नाव दिले आहे. या T20 लीगचा पहिला हंगाम 2023 मध्ये 6 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाईल. यामध्ये सहा संघ सहभागी होणार असून ही T20 लीग फ्रँचायझी आधारित आहे. अबुधाबी, दुबई आणि शारजाह येथील तीन मैदानांवर एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत.

दरम्यान, स्पर्धेची घोषणा करताना, आंतरराष्ट्रीय लीग T20 च्या आयोजकांनी सांगितले की, "अमीरात क्रिकेट बोर्ड रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders), कॅप्री ग्लोबल, GMR, लान्सर कॅपिटल, अदानी स्पोर्ट्सलाइन, ब्रॉडकास्टर झी आणि इतर सर्व भागधारकांचे UAE मधील नवीन T20 लीगमध्ये स्वागत करते. त्यांनी अमीराती क्रिकेट बोर्डावर विश्वास दाखवला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही या प्रदीर्घ प्रवासाला सुरुवात करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, एकत्रितपणे आपण नवीन उंची गाठू आणि या प्रक्रियेत जगभरातील लाखो चाहत्यांना मनोरंजन आणि उत्साह प्रदान करु.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT