पणजी: गोव्यातील ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूस (Chess)दोन लाख रुपये, तर इंटरनॅशनल (International)मास्टर (IM) खेळाडूस एक लाख रुपये देण्याची घोषणा शनिवारी गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी केली. ते केपे तालुका बुद्धिबळ संघटनेच्या चंद्रकांत नाईक स्मृती चौथ्या अखिल गोवा खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
गोव्याचे दृष्टिदोष बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय आर्बिटर किताबप्राप्त संजय कवळेकर यांना खास बक्षीस देऊन गौरविण्याचेही खासदार तेंडुलकर यांनी जाहीर केले. लवकरच केपे तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यातील द्वितीय ग्रँडमास्टर लिऑन मेंडोंसा व ऑनलाईन ऑलिंपियाड स्पर्धेत भारतीय संघातून खेळताना गतवर्षी सुवर्ण, तर यंदा ब्राँझपदक जिंकलेली इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनास वीजमंत्री नीलेश काब्राल, केपे सरकारी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक राजन मॅथ्यू, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक, खजिनदार किशोर बांदेकर, संयुक्त सचिव समीर नाईक, स्पर्धा संचालक संजय कवळेकर, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर स्वप्नील होबळे, केपे तालुका बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अमृत नाईक, स्पर्धा पुरस्कर्ते सुभाषचंद्र नाईक व संदीप नाईक यांची उपस्थिती होती.
दीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष बोर्डवर स्पर्धा
कोविड-19 (Covid 19 )महामारीच्या कालखंडात सुमारे दोन वर्षांनंतर प्रत्यक्ष बुद्धिबळ बोर्डवर (ऑफलाईन) स्पर्धा असलेल्या केपे येथे स्पर्धेस (Competition)जोरदार प्रतिसाद लाभला. महामारी मार्गदर्शक शिष्टाचाराचे पालन करून खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत राज्यातील 106 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला आहे. एकूण नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत चौथ्या फेरीअखेरीस चारही डाव जिंकून नीरज सारिपल्ली, अनिरुद्ध पार्सेकर, ऋत्विज परब, मंदार लाड यांनी संयुक्त आघाडी घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.