International Kabaddi Player  Dainik Gomantak
क्रीडा

International Kabaddi Player: क्रीडा जगत हळहळलं! सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय खेळाडू मनप्रीत मन्नूचे येथे निधन झाले. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

International Kabaddi Player Died During Match: पंजाबमधील अमृतसर येथून क्रीडा जगतासाठी एक वाईट बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू मनप्रीत मन्नूचे येथे निधन झाले. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र, आता हा तपासाचा विषय मानला जात असून त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, गुरदासपूर जिल्ह्यातील हलका डेरा बाबा नानक येथील मसाना गावचे सरपंच बिक्रम सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या गावातील आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू मनप्रीत सिंह हा एक उत्कृष्ट कॅचर होता.

आज सामना खेळत असताना अमृतसर जिल्ह्यातील खतराई कलान गावात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीत मृत्यूचे कारण डोक्याला दुखापत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस (Police) त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

सरपंच विक्रम सिंह यांनी सांगितले की, मनप्रीत नुकताच कबड्डी खेळून न्यूझीलंडहून (New Zealand) परतला होता. गेल्या महिन्यातच त्याचे (खेळाडू मनप्रीतचे) वडील मोहन सिंह यांचे निधन झाले होते.

तो आपल्या पश्चात लहान भाऊ प्रभज्योत सिंह, पत्नी आणि मुलगा सोडून गेला आहे. शुक्रवारी केशव घर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT