Vaibhav Arora Dainik Gomantak
क्रीडा

कोण आहे वैभव अरोरा? क्रिकेटला अलविदा करण्याचा घेतला होता निर्णय

आयपीएलच्या 15व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पंजाब किंग्जला 51 धावांनी विजय मिळवून देण्यात वेगवान गोलंदाज वैभव अरोराने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दैनिक गोमन्तक

आयपीएलच्या 15व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पंजाब किंग्जला 51 धावांनी विजय मिळवून देण्यात वेगवान गोलंदाज वैभव अरोराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वैभवने सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि मोईन अली सारख्या धोकादायक फलंदाजांच्या विकेट्स घेत भरपूर टाळ्या मिळवल्या. याचाच परिणाम म्हणजे आयपीएलच्या चालू हंगामातील अकराव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा डाव 126 धावांत गुंडाळला गेला. अखेर, कोण आहे हा 24 वर्षीय तरुण वेगवान गोलंदाज ज्याने या टी-20 लीगच्या पहिल्याच सामन्यात आपल्या धारदार गोलंदाजीने खळबळ उडवून दिली होती.

जेव्हा वैभव अरोराला पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये आणले तेव्हा संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय अनेकांना आवडला नाही. कारण पीबीकेने अनुभवी वेगवान गोलंदाज संदीप शर्मापेक्षा वैभवला पसंती दिली होती. संदीप शर्माला आयपीएल खेळण्याचा मोठा अनुभव आहे. 14 डिसेंबर 1997 रोजी जन्मलेला वैभव अरोरा आयपीएल पदार्पण संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर अवलंबून राहिला. ही संधी त्याने दोन्ही हातांनी मिळवली. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये 2 बळी घेत वैभवने सीएसकेची सुरुवात खराब केली. यानंतर चेन्नईचा संघ या धक्क्यातून सावरू शकला नाही.

वैभव अरोराने 4 षटकात 21 धावा देत 2 बळी घेतले. मात्र शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मासारखे फलंदाज ज्या खेळपट्टीवर धावा करत होते, त्या खेळपट्टीवर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज वैभवने आपल्या शानदार गोलंदाजीने स्वत:ला सिद्ध केले. वैभव अरोराने आपल्या देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात हिमाचल प्रदेशमधून केली होती. त्याने 2019 मध्ये सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज वैभवने मागील वर्षी 2021 मध्ये छत्तीसगडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्सने आयपीएल 2020 मध्ये उगवता वेगवान गोलंदाज वैभव अरोरा याला नेट गोलंदाज म्हणून निवडले होते. वैभव अरोरा यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. मात्र, यादरम्यान केकेआरने त्याला पदार्पणाची संधी दिली नाही. आयपीएल मेगा लिलावात पंजाब किंग्सने वैभव अरोराला 2 कोटी रुपयांत सामील करून घेतले होते. या गोलंदाजाला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये जोरदार स्पर्धा होती.

वैभव अरोरा आणि पंजाब किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ज्युनियर स्तरावर एकत्र क्रिकेट खेळत आहेत. दोघांचे बाँडिंग उत्कृष्ट आहे.अर्षदीप आणि वैभव एकमेकांच्या खेळाची चांगली जाण आहेत. वैभव अरोराने आतापर्यंत 13 टी-20 सामन्यात 14 बळी घेतले आहेत. 16 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये या वेगवान गोलंदाजाच्या नावावर 30 विकेट आहेत.

वैभव अरोराने आर्थिक अडचणींमुळे त्रस्त होऊन क्रिकेट सोडण्याचा निर्णय एकदा घेतला होता. मात्र त्याचे बालपणीचे प्रशिक्षक रवी वर्मा यांनी वैभवला यापासून रोखले. प्रशिक्षकाने त्याला खूप समजावून सांगितले आणि कठीण काळात या आश्वासक गोलंदाजाचे मनोबल वाढवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT