IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने ग्रुप स्टेजच्या 70 सामन्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते, त्यानुसार सर्व सामने मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये 4 स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. आता प्लेऑफबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. यावेळी बीसीसीआय (BCCI) लखनऊ आणि अहमदाबादमध्ये फायनलसह प्लेऑफचे 4 सामने घेण्याचा निर्णय घेऊ शकते. या मोसमात लखनऊ आणि गुजरात या दोन नव्या संघांचा समावेश झाल्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. (IPL 2022: Playoff matches may take place in these two cities, see where the finals will take place)
फायनल अहमदाबादमध्ये होऊ शकते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर प्लेऑफचे 3 सामने खेळवले जाऊ शकतात. या तीन सामन्यांमध्ये दोन क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर असेल. तर विजेतेपदासाठी अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होऊ शकते.
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या विषयावर चर्चा झाली आहे. याला काही अधिकाऱ्यांचेही पाठबळ मिळाले आहे. आता लवकरच या विषयावर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. जर या बैठकीतही सर्व काही योजनेनुसार झाले, तर लखनऊ आणि अहमदाबादच्या स्टेडियममध्ये फायनलसह प्लेऑफचे सामने पाहता येतील.
यावेळी 26 मार्चपासून आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम सुरू झाला आहे. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. यावेळी लखनऊ आणि गुजरात या दोन नव्या संघांनी प्रवेश केला आहे. अशा प्रकारे एकूण 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व संघ एकमेकांविरुद्ध 14-14 सामने खेळतील. ग्रुप स्टेजमध्ये एकूण 70 सामने होतील. यानंतर फायनलसह 4 प्लेऑफ सामने खेळवले जातील. ग्रुप स्टेडियमचे सर्व सामने पुण्यातील एमसीए स्टेडियम व्यतिरिक्त मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जात आहेत. 65 दिवसांत सर्व 10 संघांमध्ये अंतिम फेरीसह एकूण 74 सामने खेळवले जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.