Deepti Sharma Dainik Gomantak
क्रीडा

INDW Vs AUSW: दीप्ती शर्माची खतरनाक बॉलिंग; पाच विकेट्स घेत मोडला 41 वर्ष जुना रेकॉर्ड

Manish Jadhav

INDW vs AUSW 2nd ODI Mumbai Wankhede: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना वानखेडेवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कांगारु संघाला निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून केवळ 258 धावा करता आल्या. स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने भारतीय संघासाठी अप्रतिम गोलंदाजी करत 10 षटकात केवळ 38 धावा देत पाच बळी घेतले.

दीप्तीने 41 वर्षे जुना विक्रम मोडला

दीप्ती आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारी आशियाई गोलंदाज बनली आहे. यापूर्वी, 1982 मध्ये भारताच्या सँड्रा ब्रागांझा हिने शानदार गोलंदाजी केली होती.

दीप्ती शर्मा (भारत) – 5/38

सँड्रा ब्रागांझा (भारत) – 4/24

नूशीन अल खदीर (भारत) – 4/41

रुमेली धर (भारत) – 4/53

झुलन गोस्वामी (भारत) – 3/6

शशी गुप्ता (भारत) – 3/19

भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने 63 आणि एलिस पेरीने 50 धावा केल्या. शेवटी अलाना किंगने 17 चेंडूत 28 धावा केल्या. तिच्या खेळीत तीन षटकारांचा समावेश होता. अलानाने पूजा वस्त्राकरच्या शेवटच्या षटकात 18 धावा दिल्या. या खेळीनंतर अलाना किंगने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षकांचे आभार मानले. तिने सांगितले की, ''भारतीय खेळाडूंनी सात झेल सोडले. म्हणजेच ऑस्ट्रेलियन संघाला ती लाइफलाइन मिळाली नसती तर कदाचित तो 250 पर्यंत पोहोचू शकला नसता.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT