Mukesh Kumar, Mohammed Siraj, Akash Deep PTI
क्रीडा

IND vs ENG, 4th Test: बुमराहच्या जागेवर कोणाला मिळणार संधी, पडीक्कल करणार पदार्पण? पाहा भारताची संभावित 'प्लेइंग-11'

India predicted Playing XI: भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून चौथा कसोटी सामना रांचीमध्ये सुरू होणार आहे.

Pranali Kodre

India's predicted Playing XI for 4th Test in Ranchi against England:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. हा सामना रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे निश्चित आहे. कारण या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. त्यामुळे बुमराह या सामन्यात खेळणार नाही.

त्यामुळे आता रांचीत होणाऱ्या कसोटीत बुमराहच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. सध्या मुकेश कुमार आणि आकाश दीप या बंगालच्या दोन वेगवान गोलंदाजांचा पर्याय संघव्यवस्थापनेकडे आहे.

मुकेशने विशाखापट्टणला झालेला इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना खेळला आहे. मात्र त्याला त्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान, मोहम्मद सिराज तिसऱ्या सामन्यात परतल्याने, मुकेशला तिसऱ्या कसोटीतून वगळ्यात आले होते.

आता मुकेश किंवा आकाश यांच्यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बुमराहच्या जागेवर संधी मिळेल. त्यातही सध्या अनेक मीडिया रिपोर्टनुसार आकाशला संधी देण्याची दाट शक्यता आहे. जर आकाशला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, तर हे त्याचे भारतीय संघाकडून पदार्पणही ठरेल.

याशिवाय मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे, पण झाला तर फलंदाजीत एक बदल होऊ शकतो. रजत पाटीदार ऐवजी देवदत्त पडीक्कलला संधी दिली जाऊ शकते.

रजत पाटीदारने गेल्या दोन सामन्यात केवळ 46 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या जागेवर पडीक्कलचा विचार केला जाऊ शकतो. परंतु, याव्यतिरिक्त मोठा बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

सलामीला कर्णधार रोहित शर्मासह तुफान फॉर्ममध्ये असणारा यशस्वी जयस्वाल कायम असू शकतो. तसेच मधल्या फळीत शुभमन गिल आणि सर्फराज खान कायम असू शकतात. त्यांच्यासह पाटीदार किंवा पडीक्कल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेल कायम राहू शकतो.

अष्टपैलू रविंद्र जडेजा मधल्या फळीत फलंदाजीबरोबर फिरकी गोलंदाजीची जबाबदारीही सांभाळताना दिसू शकतो. तसेच आर अश्विन आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहू शकतात. त्याचबरोबर मोहम्मद सिराज बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसेल. त्याला मुकेश किंवा आकाशची साथ मिळू शकते.

मालिकेत भारतीय संघ आघाडीवर

सध्या या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता, तर दुसरा आणि तिसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे आता जर भारताने चौथा सामनाही जिंकला, तर भारतीय संघ मालिकाही जिंकेल.

मात्र, जर हा सामना इंग्लंडने जिंकला, तर मालिकेत बरोबरी होईल आणि धरमशाला येथे होणारा पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरेल. तसेच जर सामना अनिर्णित राहिला, तर भारतीय संघच या मालिकेत 2-1 ने आघाडीवर राहिल, तसेच मालिकाही गमावणार नाही, यावर शिक्कामोर्तब होईल.

चौथ्या कसोटीसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पडीक्कल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप/मुकेश कुमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT