Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

Neeraj Chopra: नीरजला ज्या थ्रोने मिळवून दिली डायमंड लीग ट्रॉफी, त्याचा Video एकदा पाहाच

नीरज चोप्राने शुक्रवारी वर्ल्ड चॅम्पियनलाही मागे टाकत विक्रमी थ्रोसह डायमंड लीगच्या पहिल्या लेगमध्ये विजय मिळवला.

Pranali Kodre

Neeraj Chopra 88.67m throw: भारताचा 'गोल्डन बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. त्याने यंदा त्याच्या नव्या हंगामाची शानदार सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री नीरजने दोहामध्ये आयोजिक डायमंड लीगच्या पहिल्या लेगमध्ये विजय मिळवत आघाडी घेतली आहे.

25 वर्षीय नीरज सप्टेंबर 2022 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये डायमंड लीग फायनलमध्ये जिंकलेले विजेतेपद कायम राखण्याच्या हेतूने यंदा या स्पर्धेत उतरला आहे. त्याने दोहामध्ये होत असेलल्या डायमंड लीगमध्ये शुक्रवारी 88.67 मीटर दूर भाला फेकला. त्यामुळे तो शेवटपर्यंत अव्वल क्रमांकावरही राहिला. तसेच ही त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीतील चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी राहिली.

महत्त्वाचे म्हणजे नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर दूर भाला फेकला होता. त्याच्यापोठापाठ या स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा जेकॉब वडलेज्च राहिला. त्याच्या आणि नीरजच्या थ्रोमध्ये केवळ 4 सेंटीमीटरचे अंतर राहिले. जेकॉबने 88.63 मीटर दूर भाला फेकला. जेकॉबने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तसेच तो गेल्यावर्षी डायमंड लीग फायनल्समध्येही नीरजनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला.

तिसऱ्या क्रमांकावर अँडरसम पीटर्स राहिला. त्याने 85.88 मीटर दूर भाला फेकला. अँडरसनने गेल्यावर्षी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये नीरजला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले होते. पण यावेळी नीरजने बाजी मारली.

नीरज 2018 मध्ये या स्पर्धेत पहिल्यांदा खेळला होता. त्यावेळी तो चौथ्या क्रमांकावर राहिला होता. नीरज भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ऍथलिट आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. तो ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ऍथलिट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

Under 23 Cricket: पहिल्या डावात आघाडी, तरीही गोव्याचा पराभव; ओडिशाने 125 धावांनी दिला धक्का

SCROLL FOR NEXT