Murali Sreeshankar Dainik Gomantak
क्रीडा

Diamond League मध्ये श्रीशंकरची लांब उडीत विक्रमी कामगिरी! नीरज चोप्राच्या पंक्तीत मिळवले स्थान

भारताच्या मुरली श्रीशंकरने पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये लांब उडीत विक्रमी कामगिरी केली आहे.

Pranali Kodre

Long jumper Murali Sreeshankar secured third place in Paris Diamond League: भारताचा खेळाडू मुरली श्रीशंकरने पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये 8.09 मीटर लांब उडी मारत लांबउडी प्रकारात तिसरे स्थान मिळवले आहे. त्यने पहिल्यांदाच या स्पर्धेत पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

याशिवाय श्रीशंकर डायमंड लीगमध्ये पहिल्या तीन जणांमध्ये स्थान मिळणारा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी टोकिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाभेकपटू नीरज चोप्रा आणि माजी थाळीफेकपटू विकास गोवडा यांनी केली आहे.

श्रीशकंरने शुक्रवारी तिसऱ्या प्रयत्नात 8.09 मीटर लांब उडी मारली. दरम्यान असे असले तरी त्याचे चालू हंगमातील सर्वोत्तम कामगिरी 8.18 मीटर लांब उडीची आहे. तसेच त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी 8.36 मीटर लांब उडीची आहे.

दरम्यान, शुक्रवारी ऑलिम्पिक पदक विजेता ग्रीसच्या मिल्टियाडीस टेंटोग्लूने पाचव्या फेरीत 8.13 मीटर लांब उडी मारत अव्वल क्रमांक पटकावला. तसेच सिमॉन इहामरने चौथ्या फेरीत 8.11 मीटर लांब उडी मारत दुसरा क्रमांक मिळवला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर श्रीशंकर राहिला. या तिघांच्या उडीमध्ये केवळ 4 सेंटीमीटरचा फरक राहिला.

श्रीशंकर तिसऱ्या फेरीपर्यंत आघाडीवर होता. पण नंतर इहामर आणि टेंटोग्लूने त्याच्या पुढे गेले.

नीरज चोप्राने गेल्यावर्षी झुरिचमध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच यावर्षी दोहामध्ये झालेल्या डायमंड लीगमध्येही तो अव्वल क्रमांकावर होता.

गोवडा 2012 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आणि 2014 मध्ये दोहामध्ये डायमंड लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तसेच 2015 साली शांघाय आणि युजिनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

दरम्यान, श्रीशंकर दुसऱ्यांदा डायमंड लीगमध्ये खेळला. तो गेल्यावर्षी मोनॅकोमध्ये झालेल्या स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर राहिला होता.

दरम्यान, अमेरिकेत सप्टेंबरमध्ये होणार्‍या डायमंड लीग फायनलसाठी श्रीशंकरने सहा पात्रता गुण मिळवले आहेत. तसेच ऑगस्टमध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी त्याला महत्त्वाचे गुणही मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT