India vs Bangladesh Dainik Gomantak
क्रीडा

India vs Bangladesh: बांग्लादेशविरूद्धच्या दोन पराभवांचा भारताने घेतला बदला; 228 धावांनी मात

ईशानचे द्विशतक तर विराटची शतकी खेळी

Akshay Nirmale

India vs Bangladesh ODI Series: बांग्लादेशविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या तिसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे एकप्रकारे या मालिकेतील या पुर्वी झालेल्या दोन सामन्यातील पराभवाचा बदलाच जणू टीम इंडियाने घेतला आहे. भारतीने बांग्लादेशवर 228 धावांनी विजय मिळवला. भारताच्या 410 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांग्लादेशचा संघ 34 षटकांतच 182 धावांमध्ये ढेपाळला.

दरम्यान, ही एकदिवसीय मालिका बांग्लादेशने 2-1 अशी जिंकली आहे. आता 14 डिसेंबर रोजी दोन्ही पहिल्या कसोटी सामन्यास सुरूवात होईल, तर दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून असणार आहे.

भारताने बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 228 धावांनी पराभव करत आपली लाज वाचवली. भारताचा सलामीवीर ईशान किशनच्या धडाकेबाज 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या. विजयासाठी 410 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव 182 धावात संपुष्टात आला. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 तर अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 43 धावा केल्या.

बांग्लादेशच्या इनिंगमध्ये अक्षर पटेलने अनमुल हकला 8 तर मोहम्मद सिराजने लिटन दासला 29 धावांवर बाद केले. बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर अनुभवी फलंदाज शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहीम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र 12 व्या षटकात अक्षर पटेलने मुशफिकूर रहीमचा 7 धावांवर त्रिफळा उडवत भारताला तिसरे यश मिळवून दिले. ­कुलदीप यादवने शाकिब अल हसनच्या झुंजार 43 धावांची खेळी संपवल्यानंतर मोहम्मदुल्ला देखील 20 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने अफिफ हुसैनला 8 धावांवर बाद करत बांगलादेशला सातवा धक्का दिला.

तत्पुर्वी ईशान किशनने बऱ्याच दिवसांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. रोहितच्या जागी आलेल्या किशनने सुरवातीला 49 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. ईशान किशन आणि विराट कोहली यांनी 18 व्या षटकात संघाचे शतक फलकावर झळकावले. ईशानने शतकी खेळी 85 चेंडूत साकारली. विराट कोहलीनेही 54 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ईशानने 103 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या, ज्यामध्ये त्याने 16 चौकार आणि 8 षटकार मारले. ईशानच्या दीडशतकानंतर कोहली आणि ईशानची द्विशतकी भागीदारीही पूर्ण झाली. ईशानचे द्विशतक आणि विराटचे शतक हेच या सामन्याचे हायलाईट ठरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT