Indian women's kabaddi team won gold for the third time, At the Asian Games defeating Chinese Taipei 26-25 in a thrilling final. Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games: भारताच्या महिला कबड्डी संघाची गोल्डन 'रेड', अंतिम सामन्यात चायनीज तैपेईला लोळवले

Asian Games: भारत आणि चायनीज तैपेई यांच्यात उत्तरार्धातही रोमांचक लढत पाहायला मिळाली. दरम्यान, भारतीय संघाला एका ऑलआऊटचा सामना करावा लागला आणि 20-21 अशा स्कोअरसह ते एका गुणाने मागे पडले.

Ashutosh Masgaunde

Indian women's kabaddi team won gold for the third time, At the Asian Games defeating Chinese Taipei 26-25 in a thrilling final:

एशियन गेम्समध्ये, भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीच्या रोमहर्षक सामन्यात चायनीज तैपेईचा 26-25 असा पराभव करत तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले.

चीनमधील हंगझोउ येथील शिओशान गुआली स्पोर्ट्स सेंटर येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात भारतीय संघाला पहिल्यांदा ऑलआऊटचा सामना करावा लागला, परंतु असे असतानाही त्यांनी स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवत चायनीज तैपेईचा पराभव केला.

एशियन गेम्सच्या इतिहासात भारतीय महिला कबड्डी संघाचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले. त्यांनी ग्वांगझू 2010 आणि इंचॉन 2014 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते, तर जकार्ता 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणविरुद्ध पराभूत होऊन संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

भारतासाठी पुष्पा राणा आणि पूजा हातवालाने रेडची सलामी दिली. पूजाने ग्रुप स्टेजमध्ये रेडमध्ये भारतासाठी सर्वाधिक गुण मिळवले होते.

पूजाच्या यशस्वी रेडमुळे भारतीय संघाने अंतिम सामन्यात आघाडीसह सुरुवात केली. मात्र, चायनीज तैपेईनेही भारताला टक्कर दिली.

7-6 असा स्कोअर असताना पूजाने सुपर रेड करत 3 टच पॉइंट आणि एक बोनस मिळवून भारताला 5 गुणांची आघाडी मिळवून दिली आणि इथून सामन्याचा कल बदलला.

पूर्वार्धाच्या अखेरीस भारतीय महिला संघाने 14-9 अशी 5 गुणांची आघाडी कायम ठेवली होती.

भारत आणि चायनीज तैपेई यांच्यात उत्तरार्धातही रोमांचक लढत पाहायला मिळाली. दरम्यान, भारतीय संघाला एका ऑलआऊटचा सामना करावा लागला आणि 20-21 अशा स्कोअरसह ते एका गुणाने मागे पडले.

अशात भारतीय महिला संघाने हार मानली नाही आणि शेवटपर्यंत आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि लवकरच रोमहर्षक सामना 26-25 असा जिंकून पुनरागमन करत एशियन गेम्समधील कबड्डी स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक पटकावले.

चायनीज तैपेईचा पराभव करून सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी भारतीय महिला कबड्डी संघाने उपांत्य फेरीत नेपाळचा (61-17) पराभव केला होता.

यंदाच्या एशियन गेम्समध्ये कबड्डीच्या गट फेरीतील सामन्यांमध्ये, भारताने चायनीज तैपेई विरुद्ध पहिला सामना (34-34) बरोबरीत सोडवला आणि नंतर दक्षिण कोरिया (56-23) आणि थायलंड (54-22) यांचा पराभव केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT