PAK vs NED, World Cup 2023: ICC विश्वचषक 2023 चा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड्स हरला, पण एक खेळाडू असा होता, जो चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला.
हा युवा खेळाडू दुसरा कोणी नसून डच अष्टपैलू बास डी लीड आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करत चार बळी घेतले. त्यानंतर, त्याने 67 धावांची शानदार खेळी खेळली.
दरम्यान, बास डी लीड हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याच्या अष्टपैलू कामगिरीसह एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे. विश्वचषकात पदार्पण करताना चार विकेट आणि अर्धशतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.
त्याच्या आधी केवळ दोनच खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. यामध्ये डंकन फ्लेचर आणि नील जॉन्सन यांच्या नावाचा समावेश होता. विश्वचषकाच्या (World Cup) इतिहासात 24 वर्षांनंतर असा पराक्रम पुन्हा घडला आहे. नील जॉन्सनने 1999 मध्ये अशी कामगिरी केली होती.
डंकन फ्लेचर (झिम्बाब्वे) – नाबाद 69 आणि चार विकेटसाठी 42 धावा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 1983
नील जॉन्सन (झिम्बाब्वे) – 59 धावा आणि चार विकेटसाठी 42 धावा, विरुद्ध केनिया – 1999
बास डी लीडे (नेदरलँड्स) – 67 धावा आणि चार विकेटसाठी 62 धावा, विरुद्ध पाकिस्तान – वर्ष 2023
लीडने या सामन्यात एकूण नऊ षटके टाकली. दरम्यान, त्याने 62 धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीत त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 68 चेंडूंचा सामना करत 67 धावा केल्या. या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
नेदरलँडसाठी फक्त पाच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बास डी लीडने सर्वाधिक 67 धावा केल्या. त्याने 68 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. सलामीवीर विक्रमजीत सिंगने 67 चेंडूत 52 धावा केल्या.
लोगान व्हॅन बीकने 28 चेंडूत 28 धावा केल्या. कॉलिन अकरमनने 17 तर साकिब झुल्फिकारने 10 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक तीन बळी घेतले.
तर हसन अलीने दोन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी, इफ्तिखार अहमद, शादाब खान (Shadab Khan) आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.