India Women Hockey Team X/TheHockeyIndia
क्रीडा

Hockey Olympic Qualifiers: भारतीय महिलांचे अमेरिकेविरुद्ध पराभवानंतर जबरदस्त कमबॅक, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला चारली धूळ

India Hockey Team: भारतीय महिला संघाने हॉकी ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेत रविवारी न्यूझीलंडला पराभूत करत पॅरिस ऑलिम्पिकच्या आशाही कायम ठेवल्या आहेत.

Pranali Kodre

Indian Women’s Hockey Team secure 3-1 win against New Zealand in Olympic Qualifiers 2024:

एफआयएच हॉकी ऑलिम्पिक क्वालिफायर रांची 2024 स्पर्धेत भारतीय महिला संघाने अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर रविवारी (14 जानेवारी) शानदार पुनरागमन केले. रविवारी भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाला 3-1 अशा फरकाने पराभवाचा धक्का देत ३ महत्त्वपूर्ण गुण मिळवले. त्यामुळे भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या आशाही कायम आहेत.

भारतीय संघाला शनिवारी (13 जानेवारी) अमेरिका महिला संघाविरुद्ध 0-1 अशा फरकाने पराभवाचा धक्का बसला होता. पण त्यानंतर रविवारी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध चांगला खेळ दाखवला.

न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून संगीता कुमारी (1'), उदिता (12') आणि ब्युटी डुंग डुंग (14') या तिघींनी प्रत्येकी एक गोल केला. न्यूझीलंडकडून एकमेव गोल मेगन हलने (9') केला.

या सामन्यात भारताने शानदार सुरुवात केली होती. पहिल्याच मिनिटाला नेहा आणि सलिमा टेटेने निर्माण केलेल्या संधीवर संगीता कुमारीने भारतासाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर लगेचच न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, त्यांना गोल करता आला नाही.

विशेष म्हणजे या सामनयात पहिल्याच क्वार्टरमध्ये रोमांचक खेळ पाहायला मिळाला होता. 9 व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून मेगन हलने गोल करत बरोबरी साधली.

पण त्यानंतर काही वेळातच लालरेमसियामीने भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यावर रविवारी वाढदिवस साजरा करणाऱ्या उदिताने 12 व्या मिनिटाला भारतासाठी दुसरा गोल नोंदवला. त्यानंतर दोनच मिनिटात ब्युटी डुंग डुंगने तिसरा गोल नोंदवत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. हाफ टाईमनंतर न्यूझीलंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याचे प्रयत्न केले, मात्र भारताच्या बचावाने शानदार खेळ केला. भारताची कर्णधार आणि गोलकिपर सविताने चांगले सेव्ह केले.

शेवटच्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. त्यामुळे भारताने हा सामना 3-1 अशा फरकाने जिंकला. आता भारताचा पुढील सामना इटलीविरुद्ध मंगळवारी (16 जानेवारी) होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT