Indian women's Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

IND W vs ENG W: भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास, T20I फायनलमध्ये इंग्लंडवर मिळवला विजय

दैनिक गोमन्तक

भारतीय महिला संघ (Indian Women Cricket Team) आणि इंग्लंड महिला संघ (India vs England) यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समधील सेमीफायनलच्या सामन्यात भारताचा विजयी झाला आहे. तसेच अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 4 धावांनी विजय मिळवत भारतीय महिला थेट फायनलमध्ये पोहोचल्या असून भारताचं किमान पदकही यावेळी निश्चित झालं आहे. (Indian women cricket team creates history defeats England in T20I final)

कॉमनवेल्थमध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश झाला असताना भारतीय महिलांनी त्यासोबतच आपले पदकही निश्चित केले आहे. आधी फलंदाजी करत भारताने इंग्लंडसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं, जे पार करताना इंग्लंडचा संघ 20 ओव्हरमध्ये 160 धावाच करु शकल्या आणि भारताला विजयी मिळाला.

दरम्यान, सामन्यात सर्वप्रथम भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने दमदार पद्धतीने सुरुवात करुन देत अर्धशतक झळकावलं. तिच्या 61 धावा भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या असं म्हणायला हरकत नाही. शेफाली 15 धावा करुन बाद झाली पण आधीच्या सामन्यात खेळी झळकवलेल्या जेमिमाने नाबाद 44 धावा करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 तर दिप्ती शर्माने 22 धावा केल्या, ज्यांच्या मदतीने भारताने 164 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.

165 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या कोणत्याच खेळाडूंना नीट टिकून खेळता आलेलं नाही. सतत विकेट्स पडत असल्यामुळे त्यांना 165 धावा 20 ओव्हरमध्ये करता आल्या नाही. इंग्लंडकडून कर्णधार नटॅलीने सर्वाधिक 41 धावा केल्या तर इतर फलंदाजांना टिकून खेळता न आल्याने 20 ओव्हरमध्ये इंग्लंड 6 गडी गमावून 160 धावाच करु शकला ज्यामुळे भारताचा 4 धावांनी विजय झाला आहे.

फायनलची लढत कोणाशी?

याच विजयासह भारतीय संघाने थेट फायनलमध्ये उडी मारली आहे. आता काही वेळात फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ कोण हे समोर येईल कारण न्यूझीलंडचा महिला संघ आणि ऑस्ट्रेलियाचा महिला संघ यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये जाणार आहे तसेच त्यामुळे भारत फायनलमध्ये कोणाशी भिडणार हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

SCROLL FOR NEXT