पणजी : भारतीय महिला क्रिकेट(Indian Women cricket team) संघातील पुनरागमन, तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मानधन श्रेणीत कायम राखल्यामुळे गोव्याची(Goa) एकमेव महिला कसोटी क्रिकेटपटू शिखा पांडे(Shikha Pandey) हिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लांबणार हे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयने नुकतीच करारबद्ध महिला क्रिकेटपटूंची मानधन श्रेणी जाहीर केली आहे. त्यात शिखाला ब श्रेणीत कायम राखले आहे. अ श्रेणीत तिघी जणी, ब श्रेणीत दहा, तर क श्रेणीत सहा जणी आहेत. हा करार ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंतचा आहे.(Indian Women Cricket Goa women cricketer Shikha Pandey international career to be extended )
पुढील महिन्यातील इंग्लंड दौऱ्यासाठी शिखाची कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघात निवड झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळेल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जाईल.
यावर्षी मार्च महिन्यात मायदेशी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अनुभवी शिखाला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. 32वर्षीय शिखाने वेगवान गोलंदाजीत 2014 पासून कसोटी, वन-डे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 113 विकेट मिळविल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.