Virat Kohli, Kane Williamson, Steve Smith, Joe Root | Test Cricket Dainik Gomantak
क्रीडा

Fab-4 100th Test: साधीसुधी गोष्ट नाही! 'हे' भारतीय अंपायर झालेत 'फॅब फोरच्या 100 व्या कसोटीचे साक्षीदार

Nitin Menon witnesses Fab Four's 100th Test: भारताच्या एका पंचांना क्रिकेटमधील सध्याच्या फॅब फोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज फलंदाजांच्या 100 व्या कसोटीचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे.

Pranali Kodre

Indian umpire Nitin Menon witnesses Fab Four's 100th Test

क्रिकेटच्या मैदानात अनेक अविस्मरणीय घटना आणि विक्रम बऱ्याचदा होताना दिसते. त्याचा साक्षीदार होण्याची संधीही अनेकांना मिळते. अशी एक अविस्मरणीय संधी भारतीय प्रशिक्षक नितीन मेनन यांना मिळाली आहे. ते फॅब फोरच्या 100 व्या कसोटीचे साक्षीदार राहिले आहे.

खरंतर क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहली, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ आणि जो रुट या साधारण समवयस्क फलंदाजांना फॅब फोर असं संबोधलं जातं. विशेष म्हणजे या चौघांच्याही 100 व्या कसोटीवेळी मेनन यांनी अंपायरिंग केली आहे.

सध्या ख्राईस्टचर्चमध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (8 मार्च) सुरू झाला आहे. हा सामना न्यूझीलंडचे खेळाडू केन विलियम्सन आणि टीम साऊदी यांचा 100 वा कसोटी सामना आहे. या सामन्यात मेनन मैदानातील पंच म्हणून काम पाहात आहेत.

दरम्यान, फॅब फोरमधील विलियम्सन सर्वात शेवटी 100 वा कसोटी सामना खेळणारा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी रुट, स्मिथ आणि विराटने 100 कसोटी सामने खेळले आहे. त्यांच्या 100 व्या सामन्यातही मेनन पंच होते.

रुटने फेब्रुवारी 2021 मध्ये चेन्नईत भारताविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळीही मेनन हे अनिल चौधरी यांच्यासह अंपायरिंग करत होते. त्या सामन्यात रुटने द्विशतकही ठोकले होते.

विराटने 100 वा कसोटी सामना मार्च 2022 मध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यावेळी मेनन यांच्यासह विरेंद्र शर्मा मैदानातील पंच होते.

स्मिथने जुलै 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना खेळला होता. त्यावेळी मेनन यांच्यासह कुमार धर्मसेना यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

दरम्यान मेनन यांना सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी मानल्या जाणाऱ्या या चारही खेळाडूंच्या 100 व्या कसोटीचा भाग होता आल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे फॅब फोर

  • 140 - जो रूट

  • 113 - विराट कोहली

  • 109 - स्टीव्ह स्मिथ

  • 100 - केन विलियम्सन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT