Indian Super League : Jaunan Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: हैदराबाद संघात स्पॅनिश बचावपटू

Indian Super League: बंगळूरच्या हुआनन याच्याशी वर्षभराचा करार

दैनिक गोमंतक

पणजी : इंडियन सुपर लीग (Indian Super League) बंगळूर एफसी (Bengaluru FC) संघातून पाच वर्षे खेळलेला स्पॅनिश बचावपटू हुआन अंतोनियो गोन्झालेझ (Juanan) आगामी मोसमात हैदराबाद एफसीतर्फे (Hyderabad FC) खेळणार आहे. मानोलो मार्किझ (Manolo Marquez) यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 34 वर्षीय खेळाडूचा सोमवारी वर्षभराचा करार केला. ‘‘गतमोसमात हैदराबाद एफसीने भक्कम खेळ प्रदर्शित केला. या संघाविषयी प्रशिक्षक मानोलो आणि इतर खेळाडूंशी चर्चा केली. हैदराबाद एफसीसाठी करार केल्याने मी आनंदित आहे. प्ले-ऑफ गाठण्याइतपत यंदाच्या मोसमात संघ मजबूत असल्याचे मला वाटते,’’ असे हुआनन याने नमूद केले. प्रशिक्षक आणि खेळाडू या नात्याने मानोलो खूपच चांगले आहेत. गतमोसमात संघासोबत त्यांनी बजावलेली कामगिरी साऱ्यांनीच पाहिले आहे, असे हुआनन यांनी हैदराबादच्या प्रशिक्षकांविषयी सांगितले. नव्या मोसमासाठी हैदराबाद एफसीने बार्थोलोमेव ओगबेचे आणि एदू गार्सिया यांच्यानंतर करारबद्ध केलेला हुआनन हा तिसरा परदेशी फुटबॉलपटू आहे.

हुआनन 1.92 मीटर उंच आहे. स्पेनमधील देपोर्तिव्हो ला कोरुना संघातर्फे त्याने सीनियर गटातील कारकीर्द सुरू केली. नंतर रेयाल माद्रिल कास्तिला संघातून खेळल्यानंतर 2012-13 मोसमात तो जर्मनीतील बुंडेस्लिगा स्पर्धेत फॉर्चुना डसेलडॉर्फ संघातून खेळला. नंतर हंगेरी, अमेरिका, पुन्हा स्पेनमध्ये खेळल्यानंतर तो 2016 मध्ये भारतात खेळण्यासाठी आला. हुआनन संघात असताना बंगळूर एफसीने 2017 साली फेडरेशन कप, 2018 साली सुपर कप, 2018-19 मोसमात आयएसएल करंडक पटकावला. 2016 मध्ये बंगळूर एफसी संघ एएफसी कप स्पर्धेत उपविजेता ठरला. आयएसएल स्पर्धेत 71 सामने खेळताना त्याने पाच गोलही केले आहेत.

आंगुलो मुंबई सिटीकडे आकर्षित

गतमोसमात आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाकडून खेळताना 14 गोल नोंदवून गोल्डन बूट पटकाविलेला 37 वर्षीय स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो नव्या संघात दिसणार आहे. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी वगळल्यानंतर आंगुलो नाराज झाला होता. 2021-22 मोसमासाठी त्याला ओडिशा एफसीने प्रस्ताव दिला होता, पण प्राप्त माहितीनुसार, आंगुलोला आयएसएल विजेत्या मुंबई सिटी एफसीच्या प्रस्तावाने आकर्षित केले आहे. ॲडम ले फाँड्रे व बार्थोलोमेव ओगबेचे या परदेशी आघाडीपटूंना मुक्त केल्यानंतर मुंबई सिटी संघ नव्या स्ट्रायकरच्या शोधात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT