Indian Super League: आयएसएल स्पर्धेत खेळणार काश्मिरी फुटबॉलपटू

Indian Super League: बंगळूर एफसीकडून दानिश फारुख दोन वर्षांसाठी करारबद्ध
Indian Super League: Danish Farooq
Indian Super League: Danish FarooqBengaluru FC

पणजीः इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आगामी मोसमात काश्मिरी फुटबॉलपटूचा सहभाग असेल. जम्मू-काश्मीरचा (Jammu and Kashmir) 25 वर्षीय आक्रमक फुटबॉलपटू दानिश फारुख (Danish Farooq) याला बंगळूर एफसीने (Bengaluru FC) दोन वर्षांसाठी करारबद्ध केले. जम्मू-काश्मीर बँक फुटबॉल अकादमीत तयार झालेला दानिश त्या संघातर्फे विविध स्पर्धांत खेळला, तसेच नेतृत्वही केले. जम्मू-काश्मीर बँक संघाकडून खेळताना त्याने 12 करंडक जिंकले. त्यानंतर दानिश आय-लीगच्या द्वितीय विभागात लोनस्टार काश्मीरकडून खेळला. नंतर त्याला रियल काश्मीर संघाने करारबद्ध केले. रियल काश्मीरने द्वितीय विभागात बाजी मारत आय-लीगसाठी पात्रता मिळविली. पहिल्याच आय-लीग मोसमात रियल काश्मीरने तिसरा क्रमांक मिळविला, त्यात दानिश कामगिरी निर्णायक ठरली. या संघातर्फे तो पाच वर्षे खेळला.

Indian Super League: Danish Farooq
India Football: सर्वोत्तम रेफरी पुरस्काराने प्रेरणा : तेजस

‘‘बंगळूर एफसी हा देशातील एक सर्वोत्तम क्लब आहे आणि त्यांचा सदस्य बनण्याची संधी मिळाल्याने मी आनंदित आहे. एएफसी कप आणि इंडियन सुपर लीग स्पर्धेत खेळताना चांगली कामगिरी करण्याचे माझे त्वरित लक्ष्य आहे. क्लबतर्फे यश प्राप्त करणे आणि खेळाडू या नात्याने प्रगती साधणे हे माझे अंतिम ध्येय आहे,’’ असे दानिशने बंगळूर एफसीच्या संकेतस्थळास सांगितले. येत्या १५ ऑगस्टला मालदीवमध्ये बंगळूर एफसी क्लब ईगल्स एफसीविरुद्ध एएफसी कप प्ले-ऑफ लढत खेळणार आहे, त्यावेळी दानिश बंगळूरतर्फे पदार्पण करण्याची शक्यता आहे. आघाडीफळीत, तसेच मध्यफळीतही खेळू शकणारा दानिश मागील तीन आय-लीग स्पर्धांत 48 सामने खेळला, त्याने 7 गोल नोंदविले असून 5 असिस्टचीही नोंद आहे. फारूख आघाडीफळीत असताना 2020 मध्ये रियल काश्मीरने आयएफए शिल्ड पटकाविली होती.

Indian Super League: Danish Farooq
I-League: सेझा अकादमीच्या शोईबशी गोकुळम केरळाचा करार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com