Mumbai City FC

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: मुंबई सिटीला सलग पाचव्या विजयाची संधी

गतविजेते मुंबई सिटी एफसीला इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सलग पाचव्या विजयाची संधी आहे.

किशोर पेटकर

पणजी: गतविजेते मुंबई सिटी एफसीला (Mumbai City FC) इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सलग पाचव्या विजयाची संधी आहे. ओळीने चार सामने जिंकलेल्या संघाची रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध (Kerala Blasters) लढत होईल. मुंबई सिटीने एकंदरीत सहा लढतीत पाच सामने जिंकून स्पर्धेत धडाका राखला आहे. त्यांचे सध्या 15 गुण असून अव्वल स्थान राखले आहे.

मागील चार लढतीत अनुक्रमे एटीके मोहन बागान (5-1), बंगळूर एफसी (3-1), जमशेदपूर (4-2), चेन्नईयीन (1-0) या संघांना हरविणाऱ्या मुंबई सिटीचे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध पारडे जड राहील. केरळच्या संघाने पाचपैकी एकच सामना जिंकला आहे. त्यांच्या खाती सहा गुण आहेत. मागील दोन लढतीत विजय व बरोबरी या कामगिरीसह चार गुणांची कमाई केरळा ब्लास्टर्सला दिलासा देणारी आहे.

स्पर्धेत मुंबई सिटीची सेट-पीस व्यूहरचना यशस्वी ठरलेली आहे, त्याचे श्रेय अहमद जाहू याला जाते. त्याने स्पर्धेत आतापर्यंत पाच असिस्टची नोंद केली असून त्यापैकी बहुतेक वेळा त्याचे फ्रीकिक फटके निर्णायक ठरले आहेत. ‘‘सर्वोत्कृष्ट सांघिक खेळामुळे आम्ही आनंदी आहोत. हंगामापूर्वीच्या शिबिरामुळे सर्व खेळाडूंना एकत्रित सराव करता आला. यंदाच्या हंगामातही दमदार सुरवात झाली. आता सातत्य राखण्याचे आव्हान आहे. मात्र, आम्हाला आव्हान स्वीकारायला आवडते,’’ असे मुंबई सिटीचे प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पूर्वसंध्येला सांगितले.

‘‘सकारात्मक खेळ करताना सातत्य राखण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतो. हंगामाच्या सुरुवातीला आम्हाला अपेक्षित खेळ करता आलेला नाही. मात्र, पुढील प्रत्येक सामन्यांत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुंबई सिटी एफसीविरुद्धही आमचा तोच प्रयत्न असेल,’’ असे केरळा ब्लास्टर्सचे मुख्य प्रशिक्षक इव्हान व्हुकोमानोविच यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing Festival: ‘गोवा स्ट्रीट रेस’ वरून नवा वाद! सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

SCROLL FOR NEXT