<div class="paragraphs"><p>Odisha FC</p></div>

Odisha FC

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: ओडिशाच्या विजयाचा जेरी ठरला 'शिल्पकार'

किशोर पेटकर

पणजी: छोट्या चणीचा 24 वर्षीय जेरी माविहमिंगथांगा सोमवारी रात्री ओडिशा एफसीच्या सनसनाटी विजयाचा शिल्पकार ठरला. या आघाडीपटूने दोन गोल केले व एक असिस्ट पुरविले, त्यामुळे भुवनेश्वर येथील संघाला इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला 4-2 फरकाने धक्का देणे शक्य झाले.

वास्को येथील टिळक मैदानावर ओडिशाने 1-2 पिछाडीवरून स्पर्धेतील चौथ्या विजयाला गवसणी घातली. जेरी याने उत्तरार्धात भन्नाट खेळ करताना चापल्य प्रदर्शित करताना मुंबई सिटीच्या बचावफळीत भंडावून सोडले. त्याने अनुक्रमे 70 व 77व्या मिनिटास गोल केला. त्यामुळे ओडिशा एफसीपाशी 3-2 अशी आघाडी जमा झाली. 89व्या मिनिटास जेरीच्या असिस्टवर ब्राझीलियन जोनाथस ख्रिस्तियन याने गोल करून किको रमिरेझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यापूर्वी पूर्वार्धात, चौथ्याच मिनिटास स्पॅनिश खेळाडू अरिदाई सुवारेझ याने ओडिशाला आघाडी मिळवून दिली होती. नंतर मोरोक्कोच्या अहमद जाहू याने 11व्या मिनिटास सणसणीत लाँग रेंजरवर केलेला गोल आणि स्पॅनिश इगोर आंगुलोने जाहूच्या असिस्टवर अप्रतिम हेडिंग साधल्यामुळे 38व्या मिनिटास मुंबई सिटीने 2-1 अशी आघाडी प्राप्त केली. 37 वर्षीय आंगुलोचा हा यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक आठवा गोल असून त्याने हैदराबाद एफसीच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याला गाठले आहे.

मागील चार लढतीत तीन पराभव व एका बरोबरीमुळे फक्त एक गुण मिळविलेल्या ओडिशाने चमकदार विजयासह गुणसंख्या 13 वर नेली. त्यांनी आता जमशेदपूरला गाठले असून गोलसरासरीत ओडिशाचा सातवा क्रमांक कायम राहिला. मुंबई सिटीचे अग्रस्थान पराभवानंतरही कायम राहिले, पण मागील तीन सामन्यांत फक्त एकच गुण नोंदवू शकलो याची सल डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला असेल. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध पराभव, नंतर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध बरोबरी नोंदविलेल्या मुंबई सिटीला तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यांचे 16 गुण कायम राहिले. दुसऱ्या स्थानी असलेल्या हैदराबाद एफसीचे 15 गुण आहेत, त्यामुळे चुरस वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

Lok Sabha Election 2024: इंडिया अलायन्स सरकार स्थापन होताच 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार: एल्टन डिकॉस्‍टा

Ramakant Khalap: ''गोव्‍यातून पोर्तुगिजांना हाकलून लावलं, पण अजूनही गोमंतकीयांना...''; खलप पुन्हा एकदा बरसले

SCROLL FOR NEXT